साताऱ्यात महाविद्यालयीन युवतींची फ्री स्टाईल मारामारी ; पोलिसांनी ताब्यात घेऊन दिली समज

सातारा ही शिवछत्रपतींचा, क्रांतीकारकांचा इतिहास अंगाखांद्यावर अभिमानाने मिरवणारी भूमी. मात्र दिवसेंदिवस साताऱ्याची संस्कृती बदलत चालली आहे. महाविद्यालयीन युवकांची हुल्लडबाजी सर्वांनी अनुभवली मात्र गुरुवारी चक्क सायन्स कॉलेजसमोरच विद्यार्थिंनीच्या फ्री स्टाईल मारामारीचा आणि शिवीगाळीचा व्हिडिओ समोर आला आणि सातारकर आवाक झाले आहेत. दरम्यान, सायंकाळी या व्हिडिओतील युवतींना व त्यांच्या पालकांना बोलावून सहाय्यक पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांनी कडक शब्दात समज दिली आहे.

    सातारा :सातारा ही शिवछत्रपतींचा, क्रांतीकारकांचा इतिहास अंगाखांद्यावर अभिमानाने मिरवणारी भूमी. मात्र दिवसेंदिवस साताऱ्याची संस्कृती बदलत चालली आहे. महाविद्यालयीन युवकांची हुल्लडबाजी सर्वांनी अनुभवली मात्र गुरुवारी चक्क सायन्स कॉलेजसमोरच विद्यार्थिंनीच्या फ्री स्टाईल मारामारीचा आणि शिवीगाळीचा व्हिडिओ समोर आला आणि सातारकर आवाक झाले आहेत. दरम्यान, सायंकाळी या व्हिडिओतील युवतींना व त्यांच्या पालकांना बोलावून सहाय्यक पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांनी कडक शब्दात समज दिली आहे.

    बधुवारी सायंकाळी सायन्स कॉलेज समोरील परिसरात युवतींच्या दोन गटात तुफान मारामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यात शिवीगाळ करत या कॉलेज युवती एकमेकांना मारत होत्या. अंगात जीन्स घातलेल्या युवतीला भलताच जोर चढला होता. तर आजुबाजूला असलेल्या युवती या मारामारीचा हसून आनंद घेत असल्याचा व्हिडिओ पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

    नुकतीच नियम पाळून शाळा, कॉलेज सुरु झालेली आहेत. सध्या व्हॅलेटाईन डेच्या पूर्वीचे डे सुरु आहेत. त्या पार्श्वभूमीवर व्हायरल झालेला हा व्हिडिओ काही युवकांच्या व्हाट्सऍपचा स्टेटस् वर झळकत आहे. त्याचीच सातारा शहरात सगळीकडे चर्चा रंगली आहे. गेल्या काही दिवसापूर्वी जावली तालुक्यातील युवकांच्या फायटींगचा व्हीडीओ व्हायरल झाला होता. आता तर सातारा शहरातील एका कॉलेजमधील युवतीच्या दोन गटात फायटींगचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

    सध्या वेगवेगळय़ा डेचे फॅड साताऱयात सुरु आहे. कोरोनामुळे नेहमीसारख्या परिक्षांचाही ताण नाही. त्यामुळे एन्जॉय करायला येणाऱया या विद्यार्थ्यांनी, युवतींच्या या फायटिंगचा आनंद मोबाईल पिढीतील युवक, युवती घेत आहेत. दिवसभर हे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायलर होत होते. नेमकी कशासाठी युवतीच्या गटात मारामारी सुरु होती याची मात्र माहिती समोर आली नाही.

    पोलिसांकडून युवतींना चांगलीच समज निर्भया पोलीस पथकास माहिती मिळताच तातडीने कारवाई करत या हाणामारीत सहभागी असलेल्या ५ ते ६ युवतींची व्हिडिओवरून ओळख करुन ताब्यात घेण्यात आले. गुरुवारी सायंकाळी ६ चा सुमारास या सर्व युवतींना सातारा उपविभागीय पोलीस कार्यालयात नेण्यात आले. तिथे सहाय्यक पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांनी युवतींना चांगल्या वर्तनाबद्दल समाज देऊन घरी पाठवले. त्यातील एका मुख्य युवतीकडून कलम १०७ खाली चांगल्या वर्तणूक बाबत बॉण्ड घेण्याचे आदेश दिले आहेत.या वेळी संबंधित मुलींचा पालकांसह नातेवाईकानी गर्दी केली होती