टेंभूचे पाणी मायणीच्या धरणात आणून दिलेला शब्द पुरा केला : डॉ. दिलीपराव येळगावकर

तत्कालीन शासनाने टेंभूच्या पाण्याचा प्रश्न सोडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. त्यामुळे आज टेंभूचे पाणी मायणीच्या धरणात आले. मी उभारलेल्या लढ्याला जनतेची साथ मिळाली. आम्ही हा लढा खटाव-माण तालुक्याच्या पूर्व भागातील ६० गावांना सिंचनाचा लाभ मिळेपर्यंत चालू ठेवणार असल्याचे सांगितले. मोठ्या कष्टाने हे पाणी मिळवूनही या पाण्याचे टेस्टिंग अधिकार्यांनी केले नाही.

    वडूज : टेंभूचे पाणी मायणीच्या धरणात आणून जनतेला दिलेला शब्द पुरा केला.असे उद्गार खटाव तालुक्याचे माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर यांनी मायणीतील धरणात आलेल्या टेंभूच्या पाण्याचे पूजन करताना काढले. याप्रसंगी मायणी ग्रामपंचायत व मायणी शहर भाजपाध्यक्ष जालिंदर माळी यांच्या मार्फत डॉ. येळगावकर यांचा फेटा बांधून व पेढे वाटून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी युवानेते सचिन गुदगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

    डॉ. येळगावकर म्हणाले, तत्कालीन शासनाने टेंभूच्या पाण्याचा प्रश्न सोडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. त्यामुळे आज टेंभूचे पाणी मायणीच्या धरणात आले. मी उभारलेल्या लढ्याला जनतेची साथ मिळाली. आम्ही हा लढा खटाव-माण तालुक्याच्या पूर्व भागातील ६० गावांना सिंचनाचा लाभ मिळेपर्यंत चालू ठेवणार असल्याचे सांगितले. मोठ्या कष्टाने हे पाणी मिळवूनही या पाण्याचे टेस्टिंग अधिकार्यांनी केले नाही.

    खासदारांना आम्ही मते देऊन निवडून आणले. पण त्यांनी टेंभूचे पाणी मायणीच्या धरणात आणल्याबद्दल कधी कौतुक केले नाही.ही दर्दैवाची बाब आहे. सरकार कोणतेही असू द्या, आम्ही आमचा पाण्याचा लढा चालू ठेवून माण-खटावचा पूर्व भाग सुजलाम-सुफलाम बनवणार असे डॉ. येळगावकर यांनी सांगितले. याप्रसंगी मोहनराव दगडे यांनी डॉ. येळगावकर यांनी केलेल्या खडतर प्रयत्नांची प्रशंसा केली. यावेळी उपसरपंच आनंदराव शेवाळे,सदस्य जगन्नाथ भिसे,नितीन झोडगे, विलासराव सोमदे, संजय गुदगे, गजानन सनगर,महादेव ढवळे,राजू कचरे,केशव शिंदे,रुस्तुम कुरणे, ऐमुद्दीन मुल्ला, अरुण सुगदरे आदि उपस्थित होते.