म्हसवड (मासाळवाडी)ता.माण येथे जैव इंधन प्रकल्पाच्या उदघाटन प्रसंगी चेअरमन दिपक कोळपे,भावेश गुळीक व इतर पदाधिकारी
म्हसवड (मासाळवाडी)ता.माण येथे जैव इंधन प्रकल्पाच्या उदघाटन प्रसंगी चेअरमन दिपक कोळपे,भावेश गुळीक व इतर पदाधिकारी

इंधन निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल शेतातच निर्माण होत असल्याने शेतकर्‍यांना शाश्वत व चांगले ऊत्पन्न मिळणार असुन येथील शेतकरी खर्‍या अर्थाने कर्जमुक्त व समृध्द होईल.सदर प्रकल्पामुळे तालुक्यातील युवापिढींना अंदाजित प्रत्यक्ष दोन हजार तर अप्रत्यक्ष दोन हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत. शेतकर्‍यांना सदर हत्ती गवताचे नविन विकसित वाण 'सुपर नेपियर' चे बियाणे कंपनीमार्फत पुरावण्यात येणार आहे.

  वावरहिरे : माण तालुका हा कायम दुष्काळ भाग म्हणुन ओळखला जातो. राज्यात सर्वांत कमी पावसाचे ठिकण म्हणुन म्हसवड शहराची ओळख आहे.तालुक्यात गत दोन तीन वर्षात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली.पावसाचे पाणी आडवण्यात आणि जिरवण्यात महाराष्ट्र शासनाची ही महत्वपुर्ण योजना ठरली. अनेक गावे टॅन्करमुक्त झाली.तालुक्याचा दुष्काळाचा कलंक हळुहळु पुसला जावु लागतोय.उरमोडीचे पाणी दुष्काळी खटाव आणि माण तालुक्याच्या काही भागात आल्याने एकुणच येथील परिस्थिती हळुहळु बदलु जावु लागलेय. आता तर चक्क या दुष्काळी माणदेशात हत्ती या गवता पासुन थेट गॅस निर्मिती होणार आहे. हा महत्वपुर्ण प्रकल्प माण तालुक्यात म्हसवड शहरातील मासाळवाडी येथे नव्याने उभारला जातोय. मुंबईच्या मीरा क्लिन फ्युएल्स (एम सी एल)संचलित प्रभुरत्न बायोफ्युल्स इंडिया प्रा. लि. प्रभुरत्न प्रोड्युसर कंपनी लि. माण यांच्या तर्फे या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे.चेअरमन दिपक कोळपे यांच्या शुभहस्ते या प्रकल्पाचा नुकताच उदघाटन सोहळा पार पडला.

  या कंपनीचे मुख्ख उदिष्टे हे हत्ती गवतापासुन बायो सीएनजी (गॅस निर्मिती) बनविणे आहे.राज्यातील लाॅकडाऊन शिथिल झाल्यानंतर प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होणार अाहे.यासाठी लागणारा कच्चा माल म्हणुन हत्ती गवत शेतातच तयार होत असल्याने येथील शेतकर्‍यांकडुन साधारणता प्रति टन एक हजार या दराने हत्ती गवत खरेदी करुन त्यापासुन प्रतिदिन शंभर टन गॅस निर्मिती येथे होणार आहे. सध्या सर्वञ पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसचे भाव सामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर जावुन गगनाला भिडले आहेत.अशातच आता सामान्यांना परवडेल असे स्वस्त दरातील जैवइंधन येथे निर्मित होणार आहे. सध्या बाजारात उपलब्ध असणारा सीएनजी मधुन अल्प प्रदुषण होते.परंतु येथे शंभर टक्के आंतरराष्ट्रीय गुणवत्तेच्या इंधनाची निर्मिती होणार असुन या स्वच्छ इंधनामुळे यातुन प्रदुषण होणार नाही.

  सदर इंधन निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल शेतातच निर्माण होत असल्याने शेतकर्‍यांना शाश्वत व चांगले ऊत्पन्न मिळणार असुन येथील शेतकरी खर्‍या अर्थाने कर्जमुक्त व समृध्द होईल.सदर प्रकल्पामुळे तालुक्यातील युवापिढींना अंदाजित प्रत्यक्ष दोन हजार तर अप्रत्यक्ष दोन हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत. शेतकर्‍यांना सदर हत्ती गवताचे नविन विकसित वाण ‘सुपर नेपियर’ चे बियाणे कंपनीमार्फत पुरावण्यात येणार आहे.या पिकाला जमीन कोणत्याही प्रकारची चालते शिवाय फारसे कष्ट घ्यावे लागत नाही.तसेच खताचा व इतर खर्चही कमी आहे. यातुन अडीच महिन्यात साधारणता एकरी चाळीस टन गवताचे उत्पादन मिळते . साधारणता वार्षिक दिडशे टन उत्पादन धरले तरी शेतकर्‍यास यातुन दिड लाख उत्पन्न हमखास मिळणार आहे. या प्रकल्पा अंतर्गत सुमारे दोन हजार हेक्टर ते दहा हजार हेक्टर पर्यंत करार शेती करणे शक्य होणार आहे. या प्रकल्पामुळे दुष्काळी माणच्या वैभवात भर पडणार असुन येथील शेतकरी खर्‍या अर्थाने सुखी आणि अर्थिक समृध्द होईल.

  आपल्या भारत देशाला ८२% इंधन आयात करावे लागते.त्यामुळे भारताचा बराचसा पैसा इंधनासाठी बाहेरच्या देशांना जातो. त्याला पर्यायी म्हणुन हा प्रकल्प आत्मनिर्भर ठरेल.तसेच हा प्रकल्प प्रदुषण मुक्त व कॅन्सरमुक्त शेतीकडे नेणारा असुन तरुणांनाही यातुन रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होणार आहेत.

  - दिपक कोळपे, चेअरमन, प्रभुरत्न बायोफ्युल्स इंडिया प्रा. लि.

  ग्रामीण भागात असा प्रकल्प होणे हे अतिशय अभिमानाची बाब आहे.आजची इंधनाची गरज लक्षात घेता पर्यायी इंधन म्हणुन हा स्वच्छ जैव इंधनाचा पर्याय आवश्यकच आहे. यासाठी लागणारा कच्चा माल शेतातच तयार होत असल्याने येथील शेतकरी खर्‍या अर्थाने कर्जमुक्त व आर्थिक समृद्ध बनेल. तरुणांना ही यातुन रोजगारांच्या अधिक संधी उपलब्ध होती
  – भावेश गुळीक, ग्राम उद्योजक, वावरहिरे