प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

क्रारदार हा पोटठेकेदार असून त्यांना रस्त्याचे काम मिळाले होते. त्या केलेल्या कामाचे ३ लाख ५० हजार रुपयांचे बिल झाले होते. बिल मंजूर करून चेक दिले होते. गामविकास अधिकारी ज्ञानेश्‍वर गायकवाड याने या मोबदल्यात ३% दराने पैशाची मागणी केली होती. याची तक्रार पोटठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात केली.

    सातारा : रस्त्याच्या कामापोटी पोटठेकेदाराकडून बिलाच्या तीन टक्के रक्कमेची लाच स्वीकारताना ग्रामविकास अधिकार्‍याला अँटिकरप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ज्ञानेश्‍वर दगडू गायकवाड वय ४८ (नेमणूक ग्रामपंचायत खेड) असे संशयिताचे नाव आहे.

    याबाबत माहिती अशी, तक्रारदार हा पोटठेकेदार असून त्यांना रस्त्याचे काम मिळाले होते. त्या केलेल्या कामाचे ३ लाख ५० हजार रुपयांचे बिल झाले होते. बिल मंजूर करून चेक दिले होते. गामविकास अधिकारी ज्ञानेश्‍वर गायकवाड याने या मोबदल्यात ३% दराने पैशाची मागणी केली होती. याची तक्रार पोटठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात केली. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली. यांनतर ७ हजार ५०० रुपयांची लाचमागणी करून तडजोडीअंती ६५०० घेताना रंगेहाथ पकडले.ही कारवाई पोलीस अधीक्षक (लाप्रवि पुणे)चे राजेश बनसोडे व अप्पर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक (लाप्रवि सातारा) अशोक शिर्के, पोलीस निरीक्षक आरिफा मुल्ला, पो.ना. राजे, ताटे, पो.कॉ. भोसले यांनी केली. तपास पोलीस निरीक्षक आरिफा मुल्ला करत आहेत.