राज्यस्तरीय प्रज्ञा शोध परीक्षेत दिशा ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी संपादन केले उत्तम यश

    सातारा : प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना अधिकाधिक विद्यार्जनासाठी प्रोत्साहित करण्यासाठी राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा (NTSE) ही परीक्षा दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते. दहावीसाठी झालेल्या राज्यस्तर परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, जीवन कारंडे, शुभम पाटील, ओमकार शिंदे, वेदांत शिंदे या दिशा ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी यात उत्तम यश मिळविले आहे. दिशा ॲकॅडमी परिवाराकडून विद्यार्थ्याचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.

    यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन करत दिशा ॲकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन कदम म्हणाले, “बौद्धिक क्षमता चाचणी, शालेय क्षमता चाचणी व भाषाकौशल्य यांचा कस शालेय जीवनातील या स्पर्धा परीक्षेमुळे लागतो. दिशामधील तज्ञ व अनुभवी शिक्षक त्या दृष्टीने विद्यार्थ्यांची तयारी करून घेतात. शिक्षणाच्या अत्याधुनिक सोईसुविधा यामुळेच ॲकॅडमीच्या यशाचा आलेख सातत्याने उंचावत आहे.”

    महाराष्ट्र राज्यासाठी ही परीक्षा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, यांच्यामार्फत घेण्यात येते. (अ) राज्यस्तरीय प्रज्ञा शोध परीक्षा (इ) राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा, असे या परीक्षेचे दोन स्तर असून या परीक्षेचा मुख्य उद्देश म्हणजे भारतातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना शिष्यवृत्ती देणे हा आहे.