सातारा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना महोत्सव समितीसह विविध संघटनेतर्फे अभिवादन

    सातारा : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती व इतर विविध संघटनांच्या वतीने पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीतर्फे अध्यक्ष ऍड. हौसेराव धुमाळ यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सरचिटणीस प्रा.माणिक आढाव, कोषाध्यक्ष अनिल वीर, सहकोषाध्यक्ष बी.एल.माने, निमंत्रक अमर गायकवाड, ऍड. विलास वहागावकर, गणेश भिसे, गौतम भोसले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

    डॉ. आंबेडकर पुतळ्यास शामराव बनसोडे, गौतम भोसले व मल्हारी गजभारे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर सामुदायिक वंदना घेण्यात आली. यावेळीही पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मान्यवरांनी अभिवादनपर मनोगत व्यक्त केली.

    प्रा. आढाव म्हणाले, “समितीतर्फे पुण्यतिथी,जयंती व विविध उपसक्रम वर्षभर राबविले जातात.” गाल्फाडे म्हणाले, “जसे डॉ.आंबेडकर व छत्रपती शिवराय यांच्या पुतळ्याजवळ अनुक्रमे निळा व भगवा ध्वज फडकत आहे. तेव्हा १ ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनापासून पिवळा ध्वज पुतळ्याजवळ फडकविण्यात येईल.”

    यावेळी शाहिरांनी गाणी-पोवाडे गाऊन संपूर्ण परिसर दणाणून सोडला. अमर गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष ऍड. हौसेराव धुमाळ यांनी आभार मानले. दोन्हीही पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यामध्ये समितीसह वंचिततर्फे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई व त्यांचे सहकारी संदीप कांबळे, भिसे, कदम आदीसह आर.पी.आय.(आठवले) यांच्या वतीने अण्णा वायदंडे व त्यांचे पदाधिकारी याशिवाय, ओबीसीचे जिल्हाध्यक्ष भरत लोकरे, विविध संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा समावेश होता.