मोकाशी कृषी महाविद्यालयाच्या कृषितांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

    म्हसवड : गोंदवले ता. माण येथील ग्रामीण जागरूकता आणि कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, संलग्न दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालय राजमाची येथील कृषिदूत सौरभ गोरखनाथ बनसोडे यांनी (गोंदवले खुर्द) येथे आधुनिक शेती, खते, बी-बियाणे, माती परीक्षण, सेंद्रिय शेती औषध फवारणी या विषयांवर मार्गदर्शन केले.

    यावेळी शेती आधारित प्रात्यक्षिके सादर करणे, शेत-जमीन व्यवस्थापन व पीक उत्पादन या विषयावर आधारित माहिती दिली व तण नियंत्रणाच्या वेगवेगळ्या पद्धतींची माहिती प्रात्यक्षिकांसह करून दाखवण्यात आली. शेतीच्या समस्या व विविध अडचणीवर कोणकोणत्या उपाययोजना करता येतील, यासारख्या विविध विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

    यावेळी प्राचार्य डॉ. शिंदे, प्रा. व्ही. व्ही. माने, प्रा. जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमाची माहिती देण्यात आली. अनेक शेतकरी उपस्थित होते.