सातेवाडी ( ता. खटाव ) येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना आ. गोपीचंद पडळकर .
सातेवाडी ( ता. खटाव ) येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना आ. गोपीचंद पडळकर .

२००६ पर्यंत खिलार बैलांसाठी अनुदान मिळत होते. त्यावेळी छोटा ट्रॅक्टर कंपन्या आल्या. त्या कंपन्यांमध्ये सर्वाधिक शेअर्स जाणता राजाचे होते. तेव्हापासून खिलार बैलांसाठीचे अनुदान बंद झाले. जाणत्या राजाच्या कार्यकाळातच खिलार बैलांचा समावेश जंगली प्राण्यांच्या यादीत करण्यात आला आणि बैलगाडी शर्यती बंद पडल्या. आम्ही बैलगाडी शर्यती भरविल्या तेव्हा आघाडीचे एक मंत्री आम्हाला अटक करण्यासाठी दबाव टाकत होते.

  खटाव : “चिल्लर खाऊन डॉलर पवारांकडे जमा करणाऱ्यालाच राष्ट्रवादी गृहमंत्रीपद देते. अजित पवार सगळा माल ढापून पोती भरुन ठेवतात, ते हिशोब देत नाहीत म्हणून त्यांना गृहमंत्रीपद दिले जात नाही. आत्ताचे गृहमंत्री वळसे पाटलांनी जपून रहावे. त्यांनी जास्त भानगडीत पडू नये कारण पवार आणि राष्ट्रवादीचा घडा भरला आहे” , असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला.

  सातेवडी ( ता. खटाव ) येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. जयकुमार गोरे, भाजप जिल्हा प्रभारी सदाशिव खाडे,तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण,विकल्प शहा, सरपंच वृषाली रोमण, ग्रामपंचायत सदस्य वडूजचे नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

  पडळकर पुढे म्हणाले, भाजपमध्ये सर्व जाती धर्माचे खासदार आमदार ते स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी आहेत. मात्र राष्ट्रवादीकडून भाजप जातीयवादी असल्याचा आरोप केला जातो. स्थापनेपासून आजपर्यंत एकच राष्ट्रीय अध्यक्ष असणारी राष्ट्रवादी ही जगातील एकमेव प्रायव्हेट लिमीटेड पार्टी आहे. या पार्टीत चिल्लर खाऊन डॉलरचा हिशोब सुप्रिया ताईंना देणाराच गृहमंत्री होतो. त्यांचे सरकार असताना एक एपीआय १०० कोटींची वसुली करतो. त्यांच्या गृहमंत्र्यांना आता तोंड लपवावे लागत फिरावे लागत आहे. देशमुख यांच्यानंतर जयंत पाटील गृहमंत्री पदासाठी टपून बसले होते मात्र दरोडेखोरांना पवार गृहमंत्री पद देत नाहीत. जो प्रामाणिकपणे नोटा गोळा करुन सुप्रियाताईंकडे देतो त्यालाच ते पद मिळते. अजित पवार नोटांचा हिशोब देत नाहीत म्हणून त्यांनाही गृहमंत्री पद मिळत नाही. १९९९ पासून पवारांनी गरीब तोंडाचेच गृहमंत्री केलेत. आता वळसे पाटलांचा नंबर लागला आहे. त्यांनी जपून रहावे. जास्त भानगडी करु नयेत. परिवहन मंत्र्यांना ईडीची नोटीस आली आहे. भ्रष्टाचारी राष्ट्रवादीचा घडा भरत आला असल्याचा इशाराच त्यांनी दिला.

  पडळकर पुढे म्हणाले, २००६ पर्यंत खिलार बैलांसाठी अनुदान मिळत होते. त्यावेळी छोटा ट्रॅक्टर कंपन्या आल्या. त्या कंपन्यांमध्ये सर्वाधिक शेअर्स जाणता राजाचे होते. तेव्हापासून खिलार बैलांसाठीचे अनुदान बंद झाले. जाणत्या राजाच्या कार्यकाळातच खिलार बैलांचा समावेश जंगली प्राण्यांच्या यादीत करण्यात आला आणि बैलगाडी शर्यती बंद पडल्या. आम्ही बैलगाडी शर्यती भरविल्या तेव्हा आघाडीचे एक मंत्री आम्हाला अटक करण्यासाठी दबाव टाकत होते. जयंतराव आणि बैलांचे काहीच नाते नाही. त्यांना शर्यती सुरु करायचे फक्त नाटक करायचे आहे. २०१७ साली फडणवीस सरकारच्या काळात करण्यात आलेल्या परिपूर्ण कायद्याचा या सरकारला न्यायालयात बाजू मांडून पाठपुरावा करता आला नाही. मराठा आरक्षणाबाबतीत हे सरकार वेळकाढूपणा करत आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा यांनी खेळखंडोबा करुन ठेवला आहे. या सरकारने राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवून टाकले आहे.

  जनता बरोबर असल्याने आमचे कुणी काही बिघडवू शकणार नाही
  मी आणि जयकुमार गोरेंसारखे सर्वसामान्य लोकप्रतिनिधी जनतेच्या हितासाठी झगडत आहोत. आम्हाला राजकीय वारसा नाही. माण – खटावमध्ये तर अनेकांना गोरेंची पोटदुखी आहे. शिमग्याला बोंबलणारे खूप आहेत पण त्यांच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या खमक्या नेत्याची आणि सर्वसामान्य जनतेची ताकद असल्याने काळजी करायचे कारण नाही असेही पडळकर यांनी सांगितले.