खंडाळा कारखाना सुस्थितीत चालवण्यासाठी सहकार्य करा ; शंकरराव गाढवे यांचे आवाहन

खंडाळा कारखान्याच्या ज्या संचालकांनी स्वतःच्या जमिनी तारण ठेऊन कारखान्यासाठी कर्ज उपलब्ध करुन दिले आहे. त्या संचालकाच्या नावे असलेल्या कर्जाची सव्याज परतफेड कारखान्याकडून करण्यात येणार आहे. तसेच या कारखान्यासाठी लागणारा निधी संस्था किंवा बँकाकडून कर्ज घेऊन उभारण्यात येईल.

    खंडाळा : शेतकऱ्यांच्या हितासाठी खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना मोठ्या कष्टाने उभा केला आहे. हा कारखाना सुव्यवस्थितपणे सुरु राहिला पाहिजे, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन खंडाळा कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव गाढवे यांनी केले.

    खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या २७ व्या वार्षिक सभेत ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष विश्वनाथ पवार, धनाजी डेरे, चंद्रकांत ढमाळ, साहेबराव मंहागरे, अनंत तांबे, भानुदास जाधव, बंडू राऊत, विशाल धायगुडे, हणमंतराव साळुंखे, साहेबराव कदम, बापुराव धायगुडे, संजीव गाढवे, शिवाजीराव शेळके-पाटील, किसन ननावरे, इंदुताई पाटील, पार्वतीबाई धायगुडे, जिल्हा बँकेचे संचालक दत्तानाना ढमाळ, आनंदराव शेळके-पाटील, भुविकास बँकेचे माजी अध्यक्ष धर्मराज शिंदे, माजी उपसभापती नारायणराव पवार, माजी सभापती प्रा. एस. वाय. पवार, कुंडलीक पवार, किसनवीरचे संचालक राहुल घाडगे, सचिव सागर गाढवे उपस्थित होते.

    शंकरराव गाढवे म्हणाले, खंडाळा कारखान्याच्या ज्या संचालकांनी स्वतःच्या जमिनी तारण ठेऊन कारखान्यासाठी कर्ज उपलब्ध करुन दिले आहे. त्या संचालकाच्या नावे असलेल्या कर्जाची सव्याज परतफेड कारखान्याकडून करण्यात येणार आहे. तसेच या कारखान्यासाठी लागणारा निधी संस्था किंवा बँकाकडून कर्ज घेऊन उभारण्यात येईल.तरी सर्व शेअर्सधारकांनी सभेत ठरल्याप्रमाणे भागाची किमंत रुपये १० हजार वरुन रुपये १५ हजार केल्याने उर्वरीत पाच हजार रुपयाचे दर्शनीमुल्य त्वरीत भरुन सहकार्य करावे तसेच नवीन सभासद होण्यासाठी रुपये १५ हजार शंभर रुपये भरावे,असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव गाढवे यांनी केले.

    संचालक धनाजी डेरे यांनी सभेत सादर केलेल्या केलेल्या सर्व विषयांना या सभेस एकमताने मंजुरी देण्यात आली.या सभेचे प्रास्तविक उपाध्यक्ष व्ही.जी.पवार यांनी केले तर शेवटी संचालक साहेबराव कदम यांनी आभार मानले.