काळोशीत ‘हायवोल्टेज’ धमाका ! तीस ते पस्तीस टिव्ही जळाले

घटनेची माहिती मिळताच शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी काळोशी येथे जाऊन पाहणी केली व झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले

    सातारा : सातारा तालुक्यातील परळी भागातील काळोशी येथे शनिवारी सायंकाळी अचानक होलटेज वाढल्याने जवळपास पस्तीस टिव्ही जळाले , कोणाचें मिटर जळाले , महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे मात्र सामान्य नागरिकांना मोठा फटका बसलाय , संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी येथील रहिवाशी करत आहेत.

    या घटनेची माहिती मिळताच शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी काळोशी येथे जाऊन पाहणी केली व झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.  गेली दोन महिने झाले स्थानिक महावितरणकडे तक्रार करत आहेत की होलटेज कमी जास्त होत आहे.  तरीदेखील संबंधित अधिकाऱ्याने जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याने ही घटना घडली असून , कोरोना सारख्या महामारीत लोकांना मोठा फटका बसला आहे.  महावितरणची चुक असल्याने येथील रहिवाश्यांना नुकसान भरपाई दिली नाही तर महावितरणच्या मुख्य कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा मोहिते यांनी दिला.