फलटण शहरासह सातारा तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट; आठ गावे कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर

सध्या फलटण शहरासह तालुक्‍यातील ग्रामीण भागातील गावांमध्ये कोरोनाचे रूग्ण हे झपाट्याने वाढत चाललेले आहेत. फलटण शहरांप्रमाणेच तालुक्यातील कोरोनाचे हॉटस्पाट असेलेली कोळकी, जाधववाडी, फरांदवाडी, विडणी, साखरवाडी, वाखरी, वाठार निंबाळकर, तरडगाव ही गावे सुध्दा कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत, अशी माहिती फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी दिली.

    फलटण : सध्या फलटण शहरासह तालुक्‍यातील ग्रामीण भागातील गावांमध्ये कोरोनाचे रूग्ण हे झपाट्याने वाढत चाललेले आहेत. फलटण शहरांप्रमाणेच तालुक्यातील कोरोनाचे हॉटस्पाट असेलेली कोळकी, जाधववाडी, फरांदवाडी, विडणी, साखरवाडी, वाखरी, वाठार निंबाळकर, तरडगाव ही गावे सुध्दा कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत, अशी माहिती फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी दिली.

    सध्या फलटण तालुक्‍यात कोरोनाचे रूग्ण हे मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहेत. कोरोनाचे हॉटस्पॉट असलेली कोळकी, जाधववाडी, फरांदवाडी, विडणी, साखरवाडी, वाखरी, वाठार निंबाळकर, तरडगाव ही गावे सुध्दा कटेंटमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आलेली आहेत. या गावामध्ये सुध्दा मेडीकल व दवाखाने वगळता इतर सर्व अत्यावश्यक सेवा सुध्दा बंद राहणार आहेत. त्या बाबतचे आदेश प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी पारित केलेले आहेत.

    २ मे ते ८ मे दरम्यान या गावातील अत्यावश्यक सेवेसह सर्व बाबी ह्या बंद राहणार आहेत. दुध, भाजीपाला व किराणा दुकाने यांना स्थानिक प्रशासनाच्या वतीने घरपोच सेवा देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे, असेही प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी स्पष्ट केले.