गोंदवले येथील राजगड पक्ष कार्यालयात सभासद नोंदणी करताना जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, राजू केंजळे, राहुल पवार व इतर
गोंदवले येथील राजगड पक्ष कार्यालयात सभासद नोंदणी करताना जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, राजू केंजळे, राहुल पवार व इतर

मनसेच्या पंधराव्या वर्धपन दिनानिमित्त झालेल्या या सभासद नोंदणी ला सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील व शहरी भागातील तरुण हे स्वयंस्फूर्तीने आले होते. त्यांचे मनसैनिक चैतन्य पाटील यांनी स्वागत केले.

    म्हसवड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यभर मनसे सभासद नोंदणी होत आहे. सातारा जिल्हा मनसे अध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या गोंदवले ता माण येथील राजगड मनसे पक्ष कार्यालयात हजारोंच्या संख्येने तरुणांनी मनसेचे सभासदत्व घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जिल्ह्यात सभासद नोंदणी चा कार्यक्रम हा इतर राजकीय पक्षला प्रेरणादायी ठरणार आहे.

    मनसेच्या पंधराव्या वर्धपन दिनानिमित्त झालेल्या या सभासद नोंदणी ला सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील व शहरी भागातील तरुण हे स्वयंस्फूर्तीने आले होते. त्यांचे मनसैनिक चैतन्य पाटील यांनी स्वागत केले. यावेळी मनसे सचिव राजू केंजळे ( मेजर ), जिल्हा उपाध्यक्ष सचिन पवार, युवराज शिंदे, बाळासाहेब गायकवाड, शहराध्यक्ष राहुल पवार, तालुकाध्यक्ष दिगंबर शिंगाडे, रोजगार स्वयंरोजगार जिल्हा संघटक सूरज लोहार, विकास फडतरे, रणजित पडमलकर, अजय पालखे, सागर कट्टे, संजय पाटील, विट्टल जाधव, महेश गायकवाड, कुलदीप माने यांच्या समवेत सभासद नोंदनिस आलेल्या तरुणांनी सोशल डिस्टनसींगचे पालन करीत मनसेचे सभासदत्व स्वीकारले.

    गोंदवले येथील राजगड या मनसे जिल्हा मुख्यालयात विविध सुविधा तसेच पक्षच्या धैय धोरणाबाबत माहिती देण्यात आली. मनसे म्हणजे सामान्यांना न्याय देणारी संघटना असे त्याचे स्वरूप बनवण्यासाठी मनसे सैनिक सिंहाचा वाटा उचलत आहे. मनसेची ही फक्त झलक आहे. तर भविष्यात विधान सभेवरती राजमुद्राची धडक आहे अशी घोषणाबाजी करण्यात आली. वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनामुळे महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातील मनसे सैनिकांचा दबदबा झाला असल्याने हीच पोहचपावती ठरली आहे. समाजकार्य करणाऱ्या युवकांसाठी मनसे हे प्रवेशद्वार आहे. अशी भावना अनेक युवकांनी व्यक्त केली.

    यावेळी जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील म्हणाले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेला पंधरा वर्षे पुर्ण झाल्याने मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यभरात सभासद नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे. ऑनलाईन नोंदणीस युवा वर्गातुन चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेली पंधरा वर्षातील मनसेच काम व चळवळ जनतेसमोर आहे. त्यामुळे जिल्ह्यात सभासद नोंदणीस चांगला प्रतिसाद मिळत आहे. यावेळी जिल्हा सचिव राजू केंजळे, शहराध्यक्ष राहुल पवार यांनी मनोगते व्यक्त केली.