ओझर्डे येथील उपकेंद्रामध्ये कोविड लसीकरणाला प्रचंड प्रतिसाद

गेल्या २ महिन्यापासून ओझर्डे उपकेंद्रामार्फत समुदाय आरोग्याधिकारी एस.एस. गायकवाड, वाय.डी. शिंदे, आरोग्यसेवक सी.वाय. रंगारी, व्ही.व्ही. गोंजारी, एस.ए. शिंदे, पी.पी. गायकवाड व आशाताई व यासोबत ग्रामपंचायतींचे सरपंच आनंदराव जाधव, ग्रामविस्तार अधिकारी जंगम, रवींद्र गवते, प्रमोद सोनावणे या सर्वांनी एकत्रित येऊन गावातील घरोघरी जाऊन दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोनो रोगाचे थैमान रोखण्यासाठी मोफत प्रतिबंधक लस करण्यात येणार असल्याचा प्रचार व प्रसार केलेला होता. 

    कवठे: ओझर्डे ता. वाई येथील प्राथमिक आरोग्य केंद्र कवठे अंतर्गत असलेल्या उपकेंद्र ओझर्डे मध्ये कोविड लसीकरणासाठी समाजप्रबोधन करून गावातील ४५ ते ८५ वयोगटातील ३०० ग्रामस्थांनी कोरोनो प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी लस घेवून असणारी भीती बाजूला ठेवत आपल्या शेजारी पाजारी राहणा-या लोकांना लस घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी हे लोक आज आरोग्य विभागाचे प्रचारकच बनले आहेत अशी परिस्थिती ओझर्डे गावात निर्माण झालेली आहे.

    गेल्या २ महिन्यापासून ओझर्डे उपकेंद्रामार्फत समुदाय आरोग्याधिकारी एस.एस. गायकवाड, वाय.डी. शिंदे, आरोग्यसेवक सी.वाय. रंगारी, व्ही.व्ही. गोंजारी, एस.ए. शिंदे, पी.पी. गायकवाड व आशाताई व यासोबत ग्रामपंचायतींचे सरपंच आनंदराव जाधव, ग्रामविस्तार अधिकारी जंगम, रवींद्र गवते, प्रमोद सोनावणे या सर्वांनी एकत्रित येऊन गावातील घरोघरी जाऊन दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोनो रोगाचे थैमान रोखण्यासाठी मोफत प्रतिबंधक लस करण्यात येणार असल्याचा प्रचार व प्रसार केलेला होता.  पण लस घेतल्यानंतर त्रास होतो व लसीचा फायदा होत नाही असा गैरसमज लोकांचा झालेला होता. हा गैरसमज दूर करून मनपरिवर्तन केल्याने ओझर्डे ग्रामपंचायतीमध्ये तब्बल ३०० लोकांची नाव नोंदणी करून लस देण्याच्या उपक्रमाची सुरुवात प्राथमिक जिल्हा परिषद शाळा येथून करण्यात आली. त्यावेळी नागरिकांची तुफान गर्दी झाली होती. हा उस्फुर्त प्रतिसाद पाहून वाई पंचायत समितीचे गट विकास अधिकारी उदय कुसूरकर, वाई तालुका आरोग्याधिकारी संदीप यादव यांनी आनंद व्यक्त करून ओझर्डे या गावात सर्वाना लस देण्यासाठी प्रयत्न करून त्यांच्यामध्ये कोरोनो प्रतिकारशक्ती निर्माण करण्याची ग्वाही या अधिका-यांनी यावेळी प्रतिनिधीशी बोलताना दिली. तरी नागरिकांनी आपापली नावनोंदणी स्वेच्छेने करून शासनाच्या मोफत लसीकरणाचा फायदा करून घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.यावेळी डॉ. विकास पिसाळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला आणि पत्रकार दौलतराव पिसाळ यांना लस देऊन लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रा. शेखर फरांदे, केशव पिसाळ,दयानंद पिसाळ व ग्रामस्थ उपस्थित होते.