भरधाव ट्रकच्या धडकेत पती-पत्नी ठार ; कराडमधील घटना

-कालेतील दांपत्यावर काळाचा घाला

कराड : कराडच्या कोल्हापूर नाक्यावर भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने काले (ता. कराड) येथील दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना  घडली. यामूळे शहरातून बाहेर जाणारी वाहतूक व महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली.

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनूसार, पुणे- बेंगलोर महामार्गावरून कराड शहरात प्रवेश करणाऱ्या दुचाकीला भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील पती-पत्नी जागीच ठार झाले. या अपघाताची माहिती कळताच पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, सहायक पोलीस निरीक्षक विजय गोडसे घटनास्थळी दाखल दाखल झाले. त्यांनी वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या मदतीने महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.

कोल्हापूर बाजूकडून उड्डाण पूलाखालून कराड शहरात येणाऱ्या वाहनधारकांना नेहमीच जीव मूठीत धरुन प्रवास करावा लागत असतो. महामार्गावरून सातारा बाजूला जाणाऱ्या वाहनांचा वेग अधिक असतो. या उड्डाण पुलाखालून शहरात प्रवेश करणार्‍या वाहनांचा  यापूर्वीही ही अनेकदा अपघात घडला आहे.

साडेतीन वाजण्याच्या सूमारास काले येथून नदाफ दाम्पत्य आपल्या दुचाकीवरून (MH-50-J-7642) कराडकडे येत होते. कोल्हापूर नाक्यावरील पूलाखालून शहरात येत असताना सातारा बाजूकडे वेगाने जाणार्‍या ट्रकने दूचाकीला धडक दिली. या धडकेत दूचाकीसह दोघांना ट्रकने काही अंतर फरपटत नेल्याचे काहींनी सांगितले. यामध्ये महिलेच्या अंगावरुन ट्रकचे चाक गेल्याने महामार्गावर रक्ताचा सडा पडला होता.