लस नसेल घेतली तर परदेशात प्रवेश नाही,भारतीय विद्यार्थ्यांची अडचण ; सातारा जिल्ह्यातील चारशेहून अधिक जणांच्या नोकरी-शिक्षणाचा प्रश्न गंभीर

भारतात सध्या ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे.पहिला डोस घेतल्यानंतर ८४ दिवसांनी दुसरा डोस घेता येणार आहे असा नियम असल्यामुळे दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत अनेकजण आहेत.त्यामुळे १८ ते ४५ वर्ष वयोगटातील नागरिकांचे लसीकरण अजून ही रामभरोसेच आहे.परदेश विमान प्रवास करावयाचा असल्यास WHO ने मान्यता दिलेली लस घेणे बंधनकारक असल्यामुळे मान्यता मिळालेली कोविशिल्ड लसच फक्त मान्यता प्राप्त आहे,व तीच लस सध्या ग्रामीण भागात सहज उपलब्ध होत आहे.

    मेढा: युरोपीय देशांनी आपल्या देशातील नागरिकांना लसीकरण करून सुरक्षित करण्यावर भर दिलेला असताना,आजही भारतात कोरोना, लॉकडाऊन सारखे प्रयोग सुरू आहेत.मात्र संपूर्ण देशातील नागरिकांचे लसीकरण केव्हा होणार असाच प्रश्न नागरिकांना पडला आहे. परदेशात उच्च शिक्षण घ्यायचे, परदेशी नोकरी करायची या इराद्याने जिल्ह्यातील अनेक तरुणांनी ऑनलाइन नोंदणी करून तेथील प्रवेश, नोकरी निश्चित केलीआहे. मात्र, सध्या राज्यात १८ ते ४५ वर्षांखालील नागरिकांच्या कोविड लसीकरणासअजून मान्यताच नसल्यामुळे या युवकांना परदेशात “नो एंट्री” झाली आहे.लसीकरण केले असेल तरच विमानप्रवासास मान्यता आहे.त्यामुळे येथील शासनाच्या चुकीच्या धोरणांचा फटका या युवकांना बसत आहे.यावर धोरणात्मक निर्णय घेऊन शिक्षण व नोकरीनिमित्त परदेशात जाणाऱ्या युवकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी या युवकांकडून होत आहे.

    भारतातून अनेक विद्यार्थी जर्मनी,अमेरिका,सारख्या यूरोपीय देशात उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतात.सातारा जिल्ह्यातून जवळपास शेकडो विद्यार्थी आजही परदेशात शिक्षण घेत आहेत.कोरोना परिस्थितीमुळे त्याच्या शिक्षणात अडथळे येत आहेत.त्यात अनेकजण प्रवेश घेऊन परदेशात जाण्या च्या तयारीत आहेत.मात्र कोरोना लस घेणे बंधनकारक असल्यामुळे अशा विद्यार्थ्यांना परदेशात जाता येत नाहीये.तर परदेशी कंपन्यामध्ये काम करणारे युवक ही जिल्ह्यात अडकून पडले आहेत.

    भारतात सध्या ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे.पहिला डोस घेतल्यानंतर ८४ दिवसांनी दुसरा डोस घेता येणार आहे असा नियम असल्यामुळे दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत अनेकजण आहेत.त्यामुळे १८ ते ४५ वर्ष वयोगटातील नागरिकांचे लसीकरण अजून ही रामभरोसेच आहे.परदेश विमान प्रवास करावयाचा असल्यास WHO ने मान्यता दिलेली लस घेणे बंधनकारक असल्यामुळे मान्यता मिळालेली कोविशिल्ड लसच फक्त मान्यता प्राप्त आहे,व तीच लस सध्या ग्रामीण भागात सहज उपलब्ध होत आहे.इतर परदेशी लसींना भारतात मान्यता जरी असली तरी त्या लस अजून ग्रामीण भागात वितरित झालेल्या दिसून येत नाहीत.

    तरी जिल्हा प्रशासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन परदेशात शिक्षण घेणाऱ्या तसेच नोकरी साठी जाणाऱ्या युवकांची गैरसोय ओळखून लसीकरण उपलब्ध करून द्यावे अशी मागणी होत आहे.