साताऱ्यात ७० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर ६ जणांचा मृत्यू

 कोरोना विषाणूने सर्वत्र जगात थैमान घातले आहे. आज शनिवार १९ जुलै रोजी साताऱ्यात ७० कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ६ जणांचा मृत्यू झाला आहे. परंतु साताऱ्यातील एकूण कोरोनाबाधित रूग्णांची संख्या पाहता, ही संख्या २ हजार २१३ इतकी झाली आहे. तसेच ६ रूग्ण दगावल्यामुळे एकूण कोरोनाबळींची संख्या ८० झाली आहे.

सातारा जिल्ह्यासोबतच संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक रूग्ण कराड तालुक्यात आढळून आले आहेत. कराड तालुक्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे येथील संख्या जवळपास ५०० च्यावर गेली आहे.   

साताऱ्या जिल्ह्यातील कोरोनाचे वाढते प्रमाण पाहून, आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनासमोर एक मोठं आव्हान उभं राहीलं आहे. तसेच कोरोना संशयित म्हणून घशाच्या स्रावांचे नमुने घेतले गेलेल्या व्यक्तींची संख्या २० हजारांवर पोहचली आहे.