साताऱ्यात प्रकाश आंबेडकर आणि गुणरत्न सदावर्तेंविरोधात गुन्हा दाखल, राजेंबद्दल केले होते आक्षेपार्ह वक्तव्य

मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी प्रकाश आंबेडकर आणि गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी संभाजीराजेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे सांभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थकांनी नाशिकमध्येही त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सातारा : वंचित बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्याविरोधात साताऱ्यात (Satara) गुन्हा दाखल (case was filed) करण्यात आला आहे. तसेच ॲड. गुणरत्न सदावर्ते ( Gunaratna Sadavarte) यांच्याविरोधातही साताऱ्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे सातारा शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा (case was filed against Prakash Ambedkar ) नोंदविण्यात आला आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी प्रकाश आंबेडकर आणि गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी संभाजीराजेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे सांभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थकांनी नाशिकमध्येही त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

प्रकाश आंबेडकरांची दोन्ही राजांवर टीका

मराठा आरक्षणाला वंचित बहुजन पक्षाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. मराठा आरक्षणासाठी ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये, असे मतही त्यांनी मांडले. या पत्रकार परिषदेत आंबेडकरांनी दोन्ही छत्रपतींवर टीका केली आहे. छत्रपती संभाजीराजे यांचे लक्ष दुसरीकडेच आहे, असे सांगत त्यांनी संभाजीराजेंवर टीका केली आहे. तर यावेळी नाव न घेता त्यांनी राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांच्यावरही टीका करत म्हणाले की, ‘एक राजा तर बिनडोक आहे, असं मी म्हणेन. दुसरे संभाजीराजे आहेत, त्यांनी मराठा आरक्षण प्रकरणी भूमिका घेतली हे बरोबर आहे. पण ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर भर देत आहेत, असं मला दिसतंय’ असे वंचित बहुजन पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

गुणरत्न सदावर्ते यांची संभाजीराजेंवर टीका

मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर बोलताना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना गुणरत्न सदावर्ते यांनी एका वृत्तवाहिनीवर खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. सदावर्तेंचे वक्तव्य अत्यंत निंदनीय असल्याचं सांगत सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निषेध करण्यात आला होता. सदावर्तेंनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत सकल मराठा समाज आणि करण गायकर यांच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर नाशिकमधील सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्येही गुन्हा दखल करण्यात आला.

गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्याची विनायक मेटेंची मागणी

एका खाजगी वृत्तवाहिनीवरील चर्चेत ‘ॲड गुणरत्न सदावर्ते यांनी छत्रपती आणि त्यांच्या घराण्याबद्दल जे वक्तव्य केले, ते अतिशय खालच्या पातळीचे आहे. ॲड. गुणरत्न सदावर्ते यांचा मी धिक्कार करतो, निषेध करतो. माझी महाराष्ट्र सरकारकडे स्पष्ट मागणी आहे. हा माणूस आधीपासूनच समाजात द्वेष पसरवण्याचे काम करत आहे. जातीयवाद पसरवत आहे. सदावर्ते यांच्यावर महाराष्ट्र सरकारने स्वतःहून गुन्हे दाखल केले पाहिजेत. त्यांना अटक केली पाहिजे. जातीयवाद आणि सांप्रदायिक दंगली भडकवण्याचा, त्यांचा जो उद्देश आहे, तो रोखला पाहिजे, अशी मागणी विनायक मेटेंनी केली.