साताऱ्यात आईने केली स्वत:च्याच दोन मुलांची गळा दाबून हत्या

आपल्या दोनही मुलांची हत्या करुन या आईने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवानं ही माता बचावली असली तरी तिची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या या मातेवर कराड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

  आई मुलाच्या नात्यापुढे जगातील सर्व नाती फिकी पडतात असं म्हटलं जातं. “माँ से बढकर कोइनही होता” “मेरी तकदीर में एक भी गम न होता अगर तकदीर लिखने का हक मेरी माँ को होता” या नात्याची महती सांगणारे असे अनेक डायलॉग प्रसिध्द आहेत. मात्र, सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात मात्र या नात्याला गालबोट लागलं आहे. कारण, कराड तालुक्यात जन्मदात्या आईनेच आपल्या दोनही मुलांची गळा दाबून हत्या केली आहे.

  आपल्या दोनही मुलांची हत्या करुन या आईने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवानं ही माता बचावली असली तरी तिची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या या मातेवर कराड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

  असं काय घडलं की आईने दोन्ही मुलांची हत्या केली

  या घटनेची माहिती मिळताच कराड पोलिस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी तपास सुरु केला. या तपासात पोलिसांना महिलेने आत्महत्या करताना लिहीलेली चिठ्ठी मिळाली असून या चिठ्ठीत त्या महिलेने आपण नैराश्यातून आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे.

  काय म्हटलंय महिलेने चिठ्ठीत

  “सहा महिन्यांपुर्वी एका अपघातात नवऱ्याचा मृत्यू झाला. नवरा गेल्याने मी खुप दु:खी आहे. आयुष्याचा जोडीदार गेल्याने मी खुप खचले आहे. त्यामुळे मी हे टोकाटं पाऊल उचलत आहे.” असं या महिलेने लिहीलं आहे.