सातारा जिल्ह्यात २४ तासात १७३ कोरोनाबाधितांची नोंद

  • साताऱ्यात एकूण कोरोना बाधितांचा आकडा ४२६६ वर गेला आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात कोरोनाचा संसर्ग पसरला आहे.

सातारा : साताऱ्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. साताऱ्यातील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा चिंता वाढवणारा आहे. मागील २४ तासात साताऱ्या जिल्ह्यात १६८ कोरोना संशयितांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच खासगी प्रयोगशाळेत केलेल्या १५ कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहे. एकूण १७३ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच २ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

साताऱ्यात एकूण कोरोना बाधितांचा आकडा ४२६६ वर गेला आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात कोरोनाचा संसर्ग पसरला आहे.