साताऱ्यात दोन गटात तलवार-रॉडचा वापर करत एकमेकांवर जोरदार हल्ला ; २ जणांचा जागीच मृत्यू

तलवारी आणि लाठ्या - काठ्याने दोन गटांनी एकमेकांवर जोरदार हल्ला केला. परंतु यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर २ जण जखमी झाले आहेत. ही घटना माण तालुक्यातील नरवणे येथे आज सकाळी घडली.

    सातारा : साताऱ्यातील माण तालुक्यामध्ये दोन गटांमध्ये हाणामारीची घटना घडली आहे. तलवारी आणि लाठ्या – काठ्याने दोन गटांनी एकमेकांवर जोरदार हल्ला केला. परंतु यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर २ जण जखमी झाले आहेत. ही घटना माण तालुक्यातील नरवणे येथे आज सकाळी घडली.

    मिळालेल्या माहितीनुसार, तहसीलदारांनी जप्त केलेल्या वाळुचा लिलाव घेतला होता. हा लिलाव मृत व्यक्ती चंद्रकांत जाधव यांना मिळाला होता. याचा राग जाधव यांच्या भावकीतील लोकांना होता. आज सकाळी याच कारणावरून दोन्ही गटात बाचाबाची झाली आणि त्याचे रुपांतर हाणामारीत झाले.

    या धुमश्चक्रीमुळे गावात एकच गोंधळ उडाला होता. या मारहाणीमध्ये विलास धोंडिबा जाधव आणि चंद्रकांत नाथाजी जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. तर विशाल जाधव, विश्वास जाधव हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी तपास केली असता या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.