महाविकास आघाडी सरकारकडून मागासवर्गीय, मराठा समाजावर अन्याय : अनिल माळी

    सातारा : राज्यात संविधान पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण व इतर मागासवर्गीयांना पूर्ववत राजकीय आरक्षण देण्यात यावे. या प्रमुख मागणीसाठी वडूज ता. खटाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपच्या वतीने ठिय्या आंदोलन केले. एक तास चाललेल्या या आंदोलनावेळी काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. मूळातच चक्काजाम आंदोलन केले जाणार अशी घोषणाबाजी केली. पण त्याचे रूपांतर ठिय्या आंदोलन झाले. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभर भाजपने दोन्ही समाज्याच्या आरक्षणाची जोरदार मागणी केली.

    भाजप पदाधिकारी अनिल माळी म्हणाले, राज्यात तीन पक्षाचे आघाडी सरकारच्या रूपाने मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय, मराठा समाजावर अन्याय केला जात आहे. आपण संघटित होऊनच न्याय मार्गाने मागण्या मान्य करून घेतल्या पाहिजेत. या वेळी युगपुरूष यांच्या नावाचा जयजयकार करण्यात आला. ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे’, भारतीय जनता पक्षाचा विजयी असो अशा शांततेत घोषणा देण्यात आल्या. सकाळी वडूज परिसरात पोलीस दलाचा मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी लावण्यात आला होता.

    सहाय्यक पोलिस निरीक्षक मालोजीराव देशमुख, भापकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केल्याने भाजपचे माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी पोलीस अधिकारी देशमुख यांचे व सर्व पोलीस दलाचे आभार मानले.

    वडूज येथील भाजपच्या ठिय्या आंदोलनाचे नियोजन भाजप पदाधिकारी अनिल माळी, श्रीकांत तथा काकासाहेब देशमुख, रामभाऊ पाटील व मान्यवरांनी केले. वडूज नगरीचे नागरिक, व्यापारी,उधोजक, प्रसार माध्यम व पोलीस महसुल यंत्रणा यांनी सहकार्य केल्याबद्दल  खटाव भाजपच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले. महसूल विभागाचे अधिकारी श्रीकांत शिर्के हे आंदोलनस्थळी आले, त्यांच्याकडे मागणीचे निवेदन देण्यात