एटीएम कार्डची अदलाबदल करीत व कमिशनचे आमिष दाखवित महाराष्ट्रासह विविध राज्यात फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा शिरवळ पोलीसांनी केला पर्दाफाश

शिरवळ पोलीसांच्या तसेच आनेवाडी टोलनाका कर्मचारी यांचे सहकार्याने आनेवाडी टोलनाका येथे मोठ्या गुन्हेगारांना कोणताही मागमुस न लागता थाटे फाटा व आनेवाडी टोलनाका येथे सापळा रचून थरारक पाठलाग करत शिताफीने , नियोजनबदरित्या ( कार क्र एम एच ०४ ई टी ०३८ ९ ) मधील १ ) प्रदीप साहेबराव पाटील वय २ ९ वर्षे २ ) विकी राजु वानखेडे वय २१ वर्षे , ३ ) किरण कचरु कोकणे वय ३५ वर्षे ४ ) महेश पांडुरंग धनगर वय ३१ वर्षे सर्व रा . म्हारळगांव , उल्हासनगर ठाणे यांना ताब्यात घेवुन अटक करण्यात आली आहे . त्यांच्याकडुन सखोल तपास केला असता शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीतील ३ गुन्ह्यांसह पडघा ( ठाणे ग्रामीण ) , अहमदनगर येथील राहुरी , सांगोला जि.सोलापुर पिपरी चिचवड येथील भोसरी पोलीस स्टेशन हदीमधील असे एकुण ८ गुन्हे उघडकीस आणणेत शिरवळ पोलीसांना यश आलेले आहे .

    वाई : विविध बँकांच्या एटीएम सेंटरमध्ये जावुन अबालवृध्द , महिला यांना एटीएमचे व्यवहार करण्यात मदतीचा बहाणा करीत त्यांची वैयक्तिक माहिती घेत हातचलाखीने एटीएम कार्डची अदलाबदल करीत तसेच रुमालामध्ये कागदाचा नोटांच्या आकाराचा पध्दतशीरपणे बंडल ( गड्डी ) बनवित कमिशनचे आमिष दाखवुन रोख स्वरुपात रक्कम घेवुन परागंदा होत फसवणुक करणाऱ्या व विविध राज्यांमध्ये गुन्हे दाखल असलेल्या उल्हासनगर , ठाणे येथील आंतरराज्य टोळीचा फर्दाफाश शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होताच २४ तासांमध्ये शिरवळ पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने केला आहे . यामध्ये आंतरराज्य टोळीचा म्होरक्यासह चार जणांना आनेवाडी टोलनाक्यावर गोव्यावरुन परतताना टण्यात येताच चित्रपटाला शोभेल असा थरारक पाठलाग करत अटक करण्यात शिरवळ पोलीसांना यश आले आहे . संबंधित टोळीकडुन टोळीकडून महाराष्ट्र , गोवा , कर्नाटक , गुजरात , मध्यप्रदेश या राज्यातील विविध पोलीस स्टेशनमधील गुन्हे उघडकीस येवुन ६२ विविध राष्ट्रीयकृत बँका व को ऑपरेटीव्ह बँकांचे एटीएम कार्ड , कारसह ३,०८,१०० / – रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे .

    याबाबतची शिरवळ पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि, शिरवळ ता . खंडाळा येथील एका खाजगी कंपनीमध्ये काम करणारे निलेश शिवाजी सुर्वे हे शिरवळ येथील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएम मध्ये रक्कम काढण्यासाठी मित्रासमवेत गेले होते . यावेळी त्यांच्या मागे असलेल्या अज्ञात दोघांनी ते करत असलेले व्यवहार पाहत व एटीएम मधुन पैसे न निघाल्यामुळे पावती पाहत असतानाच निलेश सुर्वे यांचे एटीएम कार्ड एटीएम मशीन मधुन हातचलाखीने बदलत त्याच बँकेचे त्याच रंगाचे दुसरे एटीएम कार्ड सुर्वे यांच्या हातात दिले . यावेळी निलेश सुर्वे यांच्या गोबाईलवर त्यांचे खात्यातील रक्कम शिरवळ येथील बँकेचे एटीएम सेंटरमधुन तसेच वेळे व आसले ता . वाई येथील पेट्रोलपंपावरुन अचानकपणे पन्नास हजार आठशे दहा रुपये वजा झाल्याचे संदेश प्राप्त झाल्याने निलेश सुर्वे यांनी तात्काळ शिरवळ पोलीस स्टेशन गाठत अनोळखी इसमांविरुध्द फसवणुकीचा व चोरीचा गुन्हा दाखल केला . यावेळी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन व यापुर्वी घडलेल्या अशाच प्रकारच्या जुन्या सीसीटीव्हीचे व मार्गदर्शनाखाली शिरवळ पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक उमेश हजारे , गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उप निरीक्षक गुन्हयाचे अवलोकन करीत तानाजी बरडे सोा , उपविभागीय पोलीस अधिकारी , फलटण उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमेश हजारे,पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे , पोलीस अमंलदार रविंद्र कदम , जितेंद्र शिंदे , अमोल जगदाळे , स्वप्निल दौंड यांच्या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे व सीसीटीव्हीचे पाहणी करत गुन्हेगारांच्या चोरीच्या पध्दतीचा अभ्यास करीत सदरील गुन्हा हा उल्हासनगर ठाणे येथील सराईत गुन्हेगारांनी केल्याचे निदर्शनास आले . त्यानुसार संबंधित सराईत गुन्हेगारांची माहिती घेतली असता गुन्हेगार हे गोवा राज्यात गेल्याचे दिसुन आले .

    त्यानुसार शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश हजारे , गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उप निरीक्षक सागर अरगडे , पोलीस अंमलदार रविंद्र कदम , जितेंद्र शिंदे , अमोल जगदाळे , स्वनिल दौड यांच्या पथकाने संबंधितांची गोवा राज्यापासुन हालचालींचा मागोवा घेतला असता शिरवळ पोलीसांनी आरोपीचा मागोवा घेत शेंद्रे फाटा पासुन शिरवळ पोलीस स्टेशन कडील कर्मचारी यांनी सराईत सराईत गुन्हेगार हे गोवा राज्यातुन परत उल्हासनगर ठाणे याठिकाणी जाणार असल्याची माहिती मिळाली .यावेळी त्याचप्रमाणे शिरवळ पोलीसांच्या तसेच आनेवाडी टोलनाका कर्मचारी यांचे सहकार्याने आनेवाडी टोलनाका येथे मोठ्या गुन्हेगारांना कोणताही मागमुस न लागता थाटे फाटा व आनेवाडी टोलनाका येथे सापळा रचून थरारक पाठलाग करत शिताफीने , नियोजनबदरित्या ( कार क्र एम एच ०४ ई टी ०३८ ९ ) मधील १ ) प्रदीप साहेबराव पाटील वय २ ९ वर्षे २ ) विकी राजु वानखेडे वय २१ वर्षे , ३ ) किरण कचरु कोकणे वय ३५ वर्षे ४ ) महेश पांडुरंग धनगर वय ३१ वर्षे सर्व रा . म्हारळगांव , उल्हासनगर ठाणे यांना ताब्यात घेवुन अटक करण्यात आली आहे . त्यांच्याकडुन सखोल तपास केला असता शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीतील ३ गुन्ह्यांसह पडघा ( ठाणे ग्रामीण ) , अहमदनगर येथील राहुरी , सांगोला जि.सोलापुर पिपरी चिचवड येथील भोसरी पोलीस स्टेशन हदीमधील असे एकुण ८ गुन्हे उघडकीस आणणेत शिरवळ पोलीसांना यश आलेले आहे .

    या सराईत गुन्हेगारांची पार्श्वभूमी पाहीली असता संबंधितानी महाराष्ट्र गोवा , कर्नाटक , गुजरात , मध्यप्रदेश या राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये विविध गुन्हे केल्याचे तपासाअंती निष्पन्न झालेले आहे.संबधीत सराईत गुनोगाराकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असुन त्या दृष्टीने पोलीसांचा तपास सुरु आहे यावेळी सराईत गुन्हेगाराकडुन र विविध राष्ट्रीयकृत व को – ऑपरेटीव्ह बँकांचे एटीएम कार्ड , कारसह ३.०८.१०० / – रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यामध्ये आणखी मुद्देमाल हस्तगत करण्याचे काम सुरु आहे . याबाबत शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक सागर अरगडे पुढील तपास करीत आहेत ,

    यामध्ये सातारा पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल ,अपर पोलीस अधिक्षक धिरज पाटील ,फलटण उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे यांचे मार्गदर्शनाखाली शिरवळ पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक उमेश हजारे , गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उप निरीक्षक सागर अरगडे , पोलीस अमंलदार रविंद्र कदम , जितेंद्र शिंदे , अमोल जगदाळे , स्वप्निल दौंड , धिरज यादव , संतोष ननावरे , प्रकाश फरांदे , संजय जगताप , दत्तात्रय धायगुडे यांच्या पथकाने सदरची कारवाई केलेली असून कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे सातारा पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल , अपर पोलीस अधिक्षक धिरज पाटील , उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी अभिनंदन केलेले आहे .

    ६२ एटीएम कार्ड..माहीती घेताना शिरवळ पोलीसांचा लागला कस … शिरवळ पोलीसांनी सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळलेनंतर तपासणीअंती संबंधीतांकडुन तब्बल ६२ विविध राष्ट्रीकृत बैंका , को ऑपरेटीव्ह बँकाचे एटीएम कार्ड सापडलेने शिरवळ पोलीसानाही आश्चर्याचा धक्का बसला.यावेळी शिरवळ पोलीसांनी सलग दोन दिवसरात्र विविध बँकेतील एटीएम कार्ड धारकांची माहीती व मोबाईल नंबर प्राप्त करुन घेवुन त्याचेशी संर्पक साधला असता संवधीतांची मोठया प्रमाणात फसवणुक व चोरी झालेचे निर्दशनास आले यावेळी सदर एटीएम कार्ड धारकाची माहीती घेताना शिरवळ पोलीसांना तारेवरची कसरत करत मोठया प्रमाणात पोलीसांचा कस लागला यावेळी सदर सराईत गुन्हेगाराविरुध्द यापुर्वी महाराष्ट्रातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत २४ गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झालेले आहे.याबाबत बँका पोलीस स्टेशन मार्फत माहीती घेण्याचे काम सुरु असुन यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास सुरु असुन या सराईत गुन्हेगाराकडुन आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे .