वाई तालुक्यातील चांदक येथे कोरोनाबाधितांसाठी विलगीकरण कक्ष; आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

    कवठे/विनोद पोळ : वाई तालुक्यातील चांदक येथे लोकांच्या सहभागातून व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जनता कर्फ्यू अंतर्गत वेळोवेळी जनजागृती मोहीम राबवून नियमांचे काटेकोर पालन करून वेळोवेळी उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. त्यामुळे रूग्णांचे प्रमाण कमी होऊन संक्रमण साखळी तोडण्यात यश आले होते. त्यानंतर पुन्हा रूग्णांचे प्रमाणात वाढ होऊन एकाच कुटुंबात दोन ते तीन लोकांचा एकमेकांशी संपर्क येऊन विलगिकरणात न राहिल्याने संक्रमण होऊन बाधितांचे प्रमाणात वाढत आहे.

    या सर्वावर निर्बंध आणण्यासाठी उपाययोजना म्हणून चांदक गावात कोविड १९ विलगीकरण कक्ष उघडण्यात आले. चांदक गाव कोरोनामुक्त झाले पाहिजे, ही संकल्पना समोर ठेवून जनता हायस्कूल चांदक येथे सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून स्वतंत्र खोल्यामध्ये एकूण १० खाटांचे विलगीकरण कक्ष ग्रामपंचायतीमार्फत लोकसहभागातून उघडण्यात आले. सदर कार्यक्रम शनिवार (दि. १२) सायंकाळी ४ वाजता जनता हायस्कूल चांदक येथे आयोजित करण्यात आला होता. वाई खंडाळा महाबळेश्वर तालुक्याचे आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते भैरवनाथ कोविड विलगीकरण कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी चांदक येथील दुसऱ्या संरक्षक भिंतीचे भूमिपूजनही मकरंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

    यावेळी आमदार पाटील म्हणाले की, विलगीकरण कक्षात रुग्ण राहिल्यास होणारा संसर्ग टाळल्यास कोरोनाची रुग्णसंख्या घटविण्यात नक्कीच यश येईल. सदर कार्यक्रमानिमित्त महादेव मस्कर, अनिल आबा जगताप, शशिकांत नाना पवार, सरपंच सोनाली संकपाळ, उपसरपंच मोहन आबा मोरे, ग्रामपंचायत सदस्य, गणेश संकपाळ, सोनाली जाधव, अंजना महामुनी, संमिद्रा खामकर उपस्थित होते.

    उद्योजक सुनिल संकपाळ, संभाजी संकपाळ, आशिष संकपाळ, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष आशिष संकपाळ, सुनिल दरेकर, तानाजी बापू, विश्वास भिलारे, शंकर भिलारे, युवा कार्यकर्ते मनिष भिलारे, नितीन रोमन संकपाळ, शुभम सावंत, अक्षय संकपाळ, वैद्यकीय अधिकारी ठोंबरे, संजय शिर्के, इतर ग्रामस्थ उपस्थित होते.