एमआयएम नव्हे हे तर मुस्लिम समजासाठी यम ; झाकीर पठाण यांचा ओवैसींवर निशाण

निवडणुका आल्या की, मुस्लिम समाजाचा पुळका घेऊन एमआयएमचे अध्यक्ष बॅरिस्टर ओवैसी हे निवडणूक लागलेल्या राज्यात जातात. तसेच त्यांचे समर्थक जाणून बुजून हिंदू-मुस्लीम जातीवाद वाढेल, असे शब्द वापरतात. त्याचबरोबर मुस्लिम समाजाला भावनिक करून सत्तर वर्षात आपल्याला काय मिळाले? असा विषारी प्रचार करून ते भाजपविरोधी पक्षांच्या विरोधात मुस्लिम समाजाला एकवटण्याचा प्रयत्न करतात.

  कराड : गत आठ वर्षापासून संपूर्ण देशात मुस्लिमांविरोधात वातावरण करण्याची चाल आत्ताच्या केंद्रातील सत्ताधारी गटाच्या समर्थकांकडून सुरू होती. त्यामध्ये ते यशस्वीही झाले आहेत. परंतु, त्यांच्या यशाचा पाया हा एमआयएम पक्ष असून ते आता मुस्लिमांनाही कळून चुकलेले आहे. त्यामुळे एमआयएम हे तर मुस्लिम समजासाठी यम आहेत, अशा शब्दात एमआयएमवर राष्ट्रीय काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे सातारा जिल्हाध्यक्ष झाकीर पठाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे निशाना साधला आहे.
  प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, निवडणुका आल्या की, मुस्लिम समाजाचा पुळका घेऊन एमआयएमचे अध्यक्ष बॅरिस्टर ओवैसी हे निवडणूक लागलेल्या राज्यात जातात. तसेच त्यांचे समर्थक जाणून बुजून हिंदू-मुस्लीम जातीवाद वाढेल, असे शब्द वापरतात. त्याचबरोबर मुस्लिम समाजाला भावनिक करून सत्तर वर्षात आपल्याला काय मिळाले? असा विषारी प्रचार करून ते भाजपविरोधी पक्षांच्या विरोधात मुस्लिम समाजाला एकवटण्याचा प्रयत्न करतात. हा एमआयएमचा ‘डिवाइड अँड रुल’ हा फॉर्म्युला  असून आता समाजाला त्यांची ही भूल बंगालपासून कळाली आहे. सत्तर वर्षांत काँग्रेसने काय दिले? तसेच काँग्रेस पुरोगामी विचारांची नाही, असा अपप्रचार करणाऱ्या ओवैसींनी आधी त्यांच्या बापजाद्यांनी कॉंग्रेसबरोबर सत्ता का भोगली? त्याचबरोबर तुम्ही 2013 पर्यंत याच काँग्रेसबरोबर नैतिक संबंध जोपासत सत्ता का भोगली? याचा उत्तर द्यावं, असे सावळी जिल्हाध्यक्ष झाकीर पठाण यांनी सदर प्रसिद्धीपत्रकाद्वारे उपस्थित केले आहेत.
  तसेच सत्ता बदलली की बाबा बदलतो, असे नसून सत्तेसाठी काहीही करणाऱ्या, भाजपच्या इशाऱ्यावर नाचत त्यांच्याशी अनैतिक सबंध बनवणाऱ्या व मुस्लिमांच्या खऱ्या शत्रूंविरोधात न लढता त्यांच्या पायात लोटांगण घालणाऱ्या  ओवैसींची नीती आता पश्चिम बंगालच्या मुस्लिमांनी देशातील मुस्लिमांसमोर उघड केली आहे. त्यामुळे आपल्या भाषणात ७० टक्के काँग्रेससह भाजपाचे विरोधक असणाऱ्या पक्षाच्या विरोधात बोलण्यात वेळ घालवणाऱ्या ओवेसींची ही कूटनीती आता मुस्लिम समाजाने ओळखलेली आहे. यामुळे एमआयएमच्या समर्थकांकडून दिशाभूल करणाऱ्या प्रचाराला मुस्लिम समाज आता बळी पडणार नाही. मुस्लिम समाज हा भावनिक, भोळा असून त्यांच्या भावनेशी खेळ करण्याचा प्रकार थांबवा. अन्यथा, मुस्लिम समाज भारतीय जनता पार्टीची ‘बी टीम’ असलेल्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, अशा इशाराही पठाण यांनी काँग्रेसविरोधात अपप्रचार करणाऱ्या एमआयएमच्या नेत्यांना दिला आहे.
  समाजा-समाजामध्ये द्वेष निर्माण करून ते ज्यांच्या पायात लोटांगण घालत आहेत, त्या सत्ताधारी भाजपाचा फायदा करून देणे ओवैसींनी थांबवावे. अन्यथा, जशास तसे उत्तर मिळेल, असा गर्भित इशाराही झाकीर पठाण यांनी या प्रसिद्धीपत्रकाद्वारे एमआयएमचे अध्यक्ष ओवैसी यांना दिला आहे.
  ओवैसी हे ‘बॅरिस्टर जीना पार्ट २’
  भोळ्याभाबड्या मुस्लिम समाजाला भावनिक करून दिशाभूल करणाऱ्या बॅरिस्टर असदुद्दिन ओवैसी यांनी काँग्रेसच्या राजवटीमध्ये ‘ट्रिपल तलाक’ साठी लाखोच्या संख्येने महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. तसे आजवर कधीही झाले नाही, याची जाणीव ठेवावी. एन.आर.सी.साठी महिलांना शाहीन बाग आंदोलन करावे लागले नाही. मुस्लिम बांधवांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसवणारा, देशाच्या राजकारणामध्ये मुस्लिम समाजाला योग्य वाटा देणारा पक्ष काँग्रेस आहे. तसेच सुप्रीम कोर्टाने जे ५ टक्के आरक्षण ग्राह्य धरले, काँग्रेसनेच दिले ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट असून मी ज्यांचे नेतृत्व माणून काँग्रेसमध्ये कार्यरत आहे, त्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच दिले आहे. त्यामुळे बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी हे ‘बॅरिस्टर जीना पार्ट २’ आहेत, हे आता मुस्लिम समाजाने ओळखले आहे.