पवार-मोदींच्या भेटीवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले…

जयंत पाटील हे साताऱ्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पवार-मोदी भेटीवर भाष्य केलं. शरद पवार दिल्लीत पंतप्रधान मोदींना भेटणार याची कल्पना होती. सहकार क्षेत्राशी संबंधित प्रकरणावर पवार आणि मोदींमध्ये चर्चा झाल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं. 

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज्यासह देशातील राजकारण ढवळून निघालं आहे. या दोन नेत्यांमध्ये कोणत्या विषयांवर चर्चा झाली यासंबंधीत तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोणत्या विषयांवर चर्चा झाली यासंबंधीत माहिती दिली आहे. तसंच, या भेटीची पूर्वकल्पना होती असं देखील जयंत पाटील म्हणाले.

    जयंत पाटील हे साताऱ्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पवार-मोदी भेटीवर भाष्य केलं. शरद पवार दिल्लीत पंतप्रधान मोदींना भेटणार याची कल्पना होती. सहकार क्षेत्राशी संबंधित प्रकरणावर पवार आणि मोदींमध्ये चर्चा झाल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं.

    देशातल्या वेगवेगळ्या भागातल्या सहकार बॅकिंग क्षेत्रातील लोकांनी गेल्या दीड महिन्यात अनेक निवेदनं पाठवली, लोकं भेटली. या सगळ्याचा सार करुन केंद्र सरकारने यात लक्ष घातले पाहिजे. रिझर्व्ह बँकेला योग्य त्या सूचना दिल्या पाहिजेत, यासाठी शरद पवार मोदींना भेटायला गेले. असं पाटील म्हणाले.