‘फक्त आदेश द्या, निवडणूक जिंकूनही दाखवतो’; मकरंद पाटलांची अजित पवारांना विनंती

प्रतापगड व खंडाळा कारखाना ही कर्जाच्या ओझ्याखाली आहे. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन आम्हीं 'किसनवीर' ची निवडणूक लढण्याचा निर्धार व्यक्त करत आमदार मकरंद पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Dy CM Ajit Pawar) यांना फक्त आदेश करण्याची विनंती केली.

    वाई : स्वातंत्र्यसेनानी किसनवीर यांच्या प्रयत्नातून उभा राहिलेला किसनवीर कारखाना चुकीच्या व्यवस्थापनामुळे आज बंद पडण्याच्या मार्गावर आहे. शेतकरी सभासदांना गतवर्षीची अद्याप देणी दिली गेली नाहीत. प्रतापगड व खंडाळा कारखाना ही कर्जाच्या ओझ्याखाली आहे. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन आम्हीं ‘किसनवीर’ ची निवडणूक लढण्याचा निर्धार व्यक्त करत आमदार मकरंद पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Dy CM Ajit Pawar) यांना फक्त आदेश करण्याची विनंती केली. निवडणूक जिंकूनही दाखवतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

    वाईत सोमवारी विविध विकासकामांच्या निमित्ताने अजित पवार वाईत आले होते. यावेळी वाईकरांच्या वतीने पाटील यांचा नागरी सत्कार केला. यावेळी आपल्या भाषणात मकरंद आबांनी किसनवीर कारखानाचा विषय उपस्थिती करून अजितदादा यांच्याकडे कारखाना व्यवस्थापनाच्या चुकीच्या गोष्टींचा पाढा वाचत किसनवीर बंद पडण्याच्या मार्गवार असल्याचे सांगितले.
    ते आपल्या भाषणात म्हणाले, स्वातंत्र्य सेनानी किसनवीर आबानी किकलीच्या माळावर कारखाना उभारून पाच तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याचा कार्य केले. किसनवीर कारखाना पाच तालुक्याची अर्थवाहिनी आहे. मात्र, आजमितीला या कारखान्याची दैना झाली आहे. चुकीच्या व्यवस्थापनामुळे कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे.

    गेल्यावर्षीची ८० कोटींच्या देणी अद्याप दिली गेली नाही. शेजारच्या कारखान्याची रिकव्हरी रेट हा बारा-तेरा टक्के असताना किसनवीरची रिकव्हरी रेट हा अवघा साडेआठ ते नऊ टक्के आहे. शेतकरी सभासदाचा विश्वास उडाला एवढी भयावह परिस्थिती निर्माण झाला आहे. प्रतापगड व खंडाळा कारखाना मिळून एक हजार कोटी पेक्षा अधिक कर्ज उरवार आहे. शेतकरी या कारखान्यांना ऊस घालायला घाबरत आहे. अजितदादा हा शेतकऱ्यांचा कारखाना आहे, तो वाचला पाहिजे. तुम्ही आमचे मार्गदर्शक आहात. आपण या विषयात गांभीर्याने लक्ष घाला. मला आदेश फक्त द्या. निवडणूक लढवतो आणि ती जिंकूनही दाखवतो, असे ते म्हणाले.