के. बी. उद्योग समुहाचे क्रीडा जगतात दमदार पाऊल ; के. बी. स्पोर्ट्स क्लबची स्थापना

के. बी. उद्योग समुहाचे संचालक सचिन यादव यांच्या संकल्पनेतून के. बी. फौंडेशनची स्थापना आणि त्यामाध्यमातून के. बी. स्पोर्ट्स क्लब निर्माण झाले. के. बी. स्पोर्ट क्लबने सर्व प्रथम के. बी. क्रिकेट टीमची निर्मिती करुन आपल्या कामाची मुहूर्तमेढ रोवली आहे.

    फलटण: शेती व शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य, दर्जेदार व निर्यातक्षम शेती उत्पादनासाठी प्रोत्साहन, शेतमाल रास्त दरासाठी निर्यातीमध्ये आघाडी याचबरोबर मानवी आरोग्यासाठी खेळाला प्राधान्य देत के. बी. उद्योग समुहाचे संचालक सचिन यादव यांच्या संकल्पनेतून के. बी. फौंडेशनची स्थापना आणि त्यामाध्यमातून के. बी. स्पोर्ट्स क्लब निर्माण झाले. के. बी. स्पोर्ट क्लबने सर्व प्रथम के. बी. क्रिकेट टीमची निर्मिती करुन आपल्या कामाची मुहूर्तमेढ रोवली आहे.
    अनेक दिवसांचा शोध आणि अनेक प्रकारच्या चाचण्यानंतर के. बी. क्रिकेट टीमची निर्मिती करण्यात आली असून, फलटण तालुक्यातील खेळाडूंचा समावेश या टीममध्ये करण्यात आला आहे. नुकतेच या सर्व टीमला के. बी. एक्सपोर्टस कंपनी येथे निमंत्रित करुन सर्व खेळाडूंचा सत्कार करण्यात आले, त के. बी. समुहाचे सदस्य बनल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यांना प्रतिमाह मानधन, प्रोटिन्स, स्पर्धेचेवेळचा संपूर्ण खर्च व उच्च सुख सुविधा आणि संपूर्ण किट अशा अनेक सोयी सोबतच खेळात सातत्य ठेवलेस के. बी. उद्योग समुहात काम करण्याची संधी देण्याचे ही घोषित करण्यात आले.
    के. बी. क्रिकेट टीम मध्ये निवड होऊन खेळ उंचावण्याची संधी मिळणार असल्यामुळे खेळाडू खुष होतेच त्याच सोबत घसघशीत दरमहा मानधन मिळणार असल्यामुळे आर्थिक स्थैर्य देखील लाभणार असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. उद्योगसमुहाचे संचालक सचिन यादव यांनी टीमला शुभेच्छा देऊन भविष्यात इतर खेळप्रकारात देखील के. बी. टीम तयार करण्याची ग्वाही देत मानवी आरोग्यासाठी खेळ ही आवश्यक असल्याचे नमूद करीत खेळासाठी सर्वतोपरी सहकार्याची घोषणा केली.