Karad Janata Bank license revoked; Confusion among depositor-members Action by the Reserve Bank of India

कराड जनता सहकारी बँकेचे सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई याठिकाणी असणाऱ्या एकूण २९ शाखांमध्ये ३२ हजार सभासद आहेत. आरबीआयच्या या निर्णयामुळे या सर्व सभासदांना आणि ठेवीदारांना मोठा झटका बसला आहे. या बँकेच्या संचालकांवर ३१० कोटी अपहाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

कराड :  मागील काही दिवसांपासून भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (आरबीआय) अनेक बँकांना धक्के दिले जात आहे. आरबीआयकडून आता कराड जनता सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. सहकार क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या या बँकेविरोधात करण्यात आलेल्या कारवाईमुळे बँकिंग क्षेत्रासह सभासद आणि ठेवीदारांमध्ये खळबळ माजली आहे.

दरम्यान, सहकार आयुक्तांनी बँक अवसायनतमध्ये गेल्याचे जाहीर केले केले आहे. परवाना रद्द झाल्यानंतर त्यांनी बँकेची दिवाळखोरी जाहीर केली आहे. अवसायनिक म्हणून उपनिबंधक मनोहर माळी यांची या बँकेवर नियुक्ती करण्यात आली आहे.

३१० कोटींचा अपहार

कराड जनता सहकारी बँकेचे सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई याठिकाणी असणाऱ्या एकूण २९ शाखांमध्ये ३२ हजार सभासद आहेत. आरबीआयच्या या निर्णयामुळे या सर्व सभासदांना आणि ठेवीदारांना मोठा झटका बसला आहे. या बँकेच्या संचालकांवर ३१० कोटी अपहाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे २०१७ साली या बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निर्बंध लादले होते. आरबीआयच्या आदेशानुसार ५ लाख रुपयांपेक्षा कमी ठेवीदारांचा पैसा बँक परत करेल. यासाठी कमीत कमी ३ महिने लागतील. काही दिवसांपूर्वी, महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातही अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेविरोधात अशीच कारवाई करण्यात आली होती.