कराडच्या क्रीडा संस्कृतीमध्ये केपीएल ही स्पर्धा मानाचा तुरा : सौरभ पाटील

    कराड : आयपीएलच्या धर्तीवर कराड प्रीमियर लीग पर्व २ या स्पर्धेसाठी खेळाडूंच्या लिलाव प्रक्रियेचा शुभारंभ लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील यांच्या हस्ते पार पडला.

    यावेळी कराड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पोपट साळुंखे, नगरसेवक मोहसीन आंबेकरी, शिवाजी पवार, राजेंद्र पवार, राकेश साळुंखे, सतीश भोंगाळे, शमुसद्दीक आंबेकरी, धनंजय कुंभार यांच्या उपस्थितीत होते.

    सौरभ पाटील म्हणाले, कराडच्या क्रीडा संस्कृतीमध्ये केपीएल ही स्पर्धा मानाचा तुरा आहे. नवीन खेळाडूंना वाव मिळण्याच्या दृष्टीने या स्पर्धेचे महत्व आहे.

    या लिलाव प्रक्रियेत सहभागी होणारे संघ व संघ मालक यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. शहरातील क्रिकेटप्रेमी युवकांनी एकत्र येत गतवर्षी प्रमाणे यंदाही अत्यंत नेटके नियोजन केले आहे. यावेळी संयोजन समितीचे मंजीत आत्तार, मेहबूब शेख, जटाप्पा हीपगार व खेळाडू बहुसंख्येने उपस्थित होते.

    असा आहे संघांचा समावेश…

    या स्पर्धेमुळे कराड शहरासह जिल्ह्यातील उदयोन्मुख क्रिकेटपटूंच्या खेळगुणांना वाव मिळणार आहे. वन-डे स्पेशल, आदिमाया स्पोर्ट्स, शिवप्रेमी स्पोर्ट्स, सहारा स्पोर्ट्स, अमितराज अंश स्पोर्ट्स, युनिव्हर्सल केके स्पोर्ट्स, सनी स्पोर्ट्स, त्रीनय सुमित स्पोर्ट्स या संघांनी सहभाग घेतला आहे.

    ७ नोव्हेंबरपासून केपीएलचा थरार

    ७ नोव्हेंबर २०२१ पासून थरार कराडकरांना छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे पहायला मिळणार आहे.