क्रांतिवीर संकुलास उज्ज्वल भवितव्य : प्राचार्य आर. डी. गायकवाड

    म्हसवड / प्रतिनिधी : सर्वांगीण दर्जात्मक प्रगतीमुळे क्रांतिवीर संकुल म्हसवड यांना उज्ज्वल भवितव्य असल्याचे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव प्राचार्य आर. डी. गायकवाड यांनी व्यक्त केले.

    कृषी विकास प्रतिष्ठान संचलित क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवड येथे नुकतीच प्राचार्य आर. डी. गायकवाड यांनी भेट दिली. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी शाळा म्हसवड माध्यमिक विद्यालय ज्युनिअर कॉलेज तसेच इंग्रजी माध्यम शाळेच्या परिसराची प्राचार्य गायकवाड यांनी पाहणी केली. या संकुलाअंतर्गत होऊ घातलेल्या भव्य इमारत बांधकामाची पाहणी करून भव्यता व दर्जाबद्दल समाधान व्यक्त केले.

    क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाने अल्पावधीत केलेल्या शैक्षणिक प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करून क्रांतिवीर संकुल शैक्षणिकदृष्ट्या क्रांतिकारी संकुल ठरेल, असा विश्वास प्राचार्य गायकवाड यांनी व्यक्त केला. संस्था अध्यक्ष प्रा विश्वंभर बाबर यांनी प्राचार्य आर डी गायकवाड यांचा सन्मान केला. मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांनी संकुलात राबविण्यात येणाऱ्या ऑनलाइन शिक्षण सुविधांसह इतर विविध उपक्रमांची माहिती दिली.