प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

कराडच्या कृष्णा रुग्णालयात २२५गर्भवती महिलांनी कोरोनाची लागण झाली असताना बाळांना जन्म दिला. या नवजात बाळांना सांभाळायचे कसे आणि कुणी हा प्रश्न होता मात्र हॉस्पिटलमधल्या नर्सनी पुढाकार घेऊन याची जबाबदारी घेतली. या छोट्याशा पिल्लांना आठ-दहा दिवस या नर्सेसनी आपल्या पंखाखाली घेतले.

    कराड: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा भारताला बसला. कोरोना काळात अनेक जणांना अडचणींना सामोरे जावे लागले . यामध्ये अनेक नागरिकांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला तर अनेक गर्भवती महिलांनाही याची लागण झालेली दिसून आली. कराडच्या कृष्णा हॉस्पिटलने एक दोन नव्हे तब्बल २२५ कोरोनाबाधित गर्भवती महिलांची सुरक्षितपणे प्रसूती केली आहे. इतकेच नव्हे कोरोनामुळे बाधित असल्याने नवजात बाळांचा सांभाळ करण्यास अडचणी येत असलेल्या नवजातांना रुग्णालयातील परिचारिकांनी मायेची उब दिलीचे समोर आले आहे. कृष्णा रुग्णालयाने दाखवलेल्या या माणुसकीमुळे रुग्णालायात परिसर चर्चेचा विषय ठरले आहे.

    कोरोनाची लागण झाली असताना प्रसुत झालेल्या बाळंतीणींनाही अशाच त्रासाचा सामना करावा लागला. बाळाला जन्म दिला की बाळ आईसोबत ठेवता येत नाही. आईच्या हातात बाळ देणं तर दूरची गोष्ट. कुठला नातेवाईकही बाळाच्या जवळ जाऊ शकत नसल्यामुळे मोठी समस्या निर्माण होते.

    नर्सच्या पुढाकाराने प्रश्न मिटला

    कराडच्या कृष्णा रुग्णालयात २२५गर्भवती महिलांनी कोरोनाची लागण झाली असताना बाळांना जन्म दिला. या नवजात बाळांना सांभाळायचे कसे आणि कुणी हा प्रश्न होता मात्र हॉस्पिटलमधल्या नर्सनी पुढाकार घेऊन याची जबाबदारी घेतली. या छोट्याशा पिल्लांना आठ-दहा दिवस या नर्सेसनी आपल्या पंखाखाली घेतले आणि यशस्वीपणे जपलंही. कृष्णा हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने कोविडचा ताण असतानाही बाळांच्या आई पूर्ण कोरोनामुक्त होत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या पिल्लांची जबाबदारी घेतली. यासाठी लागणारे मनुष्यबळही पुरवले. त्यामुळे ह्या स्टाफचे काम अभिमानस्पद असल्याची भावना व्यक्त आहे.