मुळे मायनरला भगदाड; लाखो लिटर पाणी वाया

    ओझर्डे : वाई तालुक्यातील धोम धरणाचा डावा कालवा हा वरखडवाडी शेलारवाडी वाई एमआयडीसी वाई शेंदुरणे खानापुर पांडे ओझर्डे धुमाळवाडी देखावा किकली कांळगवाडी मार्गे पुढे १४० कि.मी .अंतरा पर्यंत जातो याच कालव्यात दि.४ रोजी धरणातून पाणी सोडण्यात आले होते.

    पण ओझर्डे ता.वाई गावच्या हद्दीतून हे पाणी पुढे जात असतानाच मायनर क्र.१४ वर मध्य रात्रीच्या सुमारास मोठे भगदाड पडल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले मोठ्या प्रमाणात
    या पडलेल्या भगदाडातुन पाण्याचे लोटचे लोट वाहु लागल्याने ते सर्व पाणी ओढ्याच्या अरुंद पात्रातून धावत असल्याने कालवा कुठल्याही क्षणी फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे कालवा जर फुटलाच तर लगतची पिकासह शेत जमीन वाहुन जाण्याचा धोका निर्माण झाल्याने शेतकर्यांन मध्ये चिंतेचे आणी भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या डाव्या कालव्याला नेहमीच मोठ मोठाली भगदाड पडत असताना देखील धोम धरणाचे ऊप अभियंता हे कार्यालयातील पंख्या खाली बसुन कालवा सुस्थितीत व सर्व काही अलबेल असल्याचा अहवाल तयार करुन सातारा येथील कार्यकारी अभियंता यांना पाठवुन आपली नोकरी आणी खुर्ची टिकावी याची धडपड करताना नेहमीच आढळून येतात पण त्यांच्या या बेजबाबदार वागण्याने शासनाचे लाखो रुपयांचे होणार्या नुकसानीस त्यांना जबाबदार धरून वाया गेलेल्या लाखो लिटर पाण्याच्या पैशाची वसुली करावी अशी मागणी वाई तालुक्यातील शेतकर्यांनी केली आहे वसुली केली नाही तर कुठलाच शेतकरी पाणी पट्टीचे पैसेच भरणार नाही असा इशारा वाई तालुक्यातील शेतकर्यांनी दिला आहे .