वरकुटे-मलवडीचा आदर्श निर्माण करू : सरपंच बाळकृष्ण जगताप

  म्हसवड : वरकुटे-मलवडी हे माण तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेले गाव आहे. राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वपूर्ण असलेले गाव म्हणून प्रसिद्ध आहे. दुष्काळ पाचवीला पुजला असला तरी या गावात बुध्दीवंतांची व दानशूर खाण आहे. या गावातील सामान्य जनतेने माझ्यावर विश्वास ठेऊन प्रथमच मला लोकनियुक्त सरपंच होण्याचा बहुमान दिला.  त्या विश्वासाला तडा न जाऊ जाऊ देणार नाही. सरपंच पदाच्या कार्यकाळात गावातील विकासकामे अधिक गतिने करणार असून विकासकामातून जिल्ह्यात आदर्श निर्माण करण्यात येईल, असा विश्वास सरपंच बाळकृष्ण जगताप यांनी व्यक्त केला.

  पायाभूत सुविधा पुरविण्याला प्राधान्य

  ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक विकास कामे केली आहेत. अंतर्गत सिमेंट रस्ते , सिंगल फेज वीजपुरवठा, हायमँक्स, गटार, अंगणवाडीवाडी इमारत, प्राथमिक शाळा इमारत, लहान मुले-मूली, महिला पुरुष असे स्वतंत्र मुतारी यूनिट, वाड्या वस्त्यांवर नवीन रस्ते व जून्या रस्त्यावर मुरमीकरण, सिमेंट कांॅक्रीटीकरण, चौका चौकात बैठक व्यवस्था इत्यादी कामे केली आहेत. यापुढे ही ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व नागरिकांना पायाभूत सुविधा पुरविण्याला प्राधान्य राहील. आरोग्य सुविधा, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छ व वेळेत पाणीपुरवठा, शिक्षण सुविधा, दळणवळणाची साधने, महिलांचे सबलीकरण करून सर्व महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यावर आपला भर राहील, सरपंच जगताप यांनी सांगितले.

  स्वखर्चाने हनुमान मंदिराचा जिर्णोद्धार

  सरपंच बाळकृष्ण जगताप व त्यांचे लहानबंधू हणमंत जगताप यांनी स्वखर्चाने गावातील हनुमान मंदिराचा एक कोटी रुपये खर्चून जिर्णोद्धार केला आहे. याच मंदिरात नव्याने श्री गणेश, श्री दत्त, श्री राम लक्ष्मण सिता व नवग्रहांच्या मूर्तीच्या स्थापना केल्या आहेत. कोविडच्या काळात लोकांना स्वखर्चाने जेवण दिले. कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा महाभयंकर आहे. यात खेडोपाडी कोरोनाची लागण होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे.

  जागतिक संकट कोरोना संसर्गामुळे बाधित झालेल्या नागरिकांना आगोदरच कोरोना झालेल्याचं दु:ख असत. त्यामुळे घरातील वातावरणही चिंतेच बनलेलं असत तर काही सहवासात आलेल्या निकटवर्तीय कुटुंबियांचे विलगीकरण केलं जाते. या काळात रुग्ण व कर्मचाऱ्यांना ग्रामस्तरावर अावश्यक ती मदत केली, असे सरपंच जगताप यांनी नमुद केले.

  काेराेना काळात दु:खाचा डोंगर कोसळलेल्या कुटुंबियांना, दुरवर उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णास जेवणाचा डबा पोहच करण्यासाठी अनेक अडचणी येतात. यावर सकारात्मक विचार करून हणमंत जगताप व आपण वरकुटे-मलवडीत यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये लोकसहभागातून सुरु असलेल्या संकल्प कोरोना सेंटरमधील कर्मचारी आणि रुग्णांना सुरूवातीपासून दोनवेळचे पोटभर जेवण, नाष्टा मोफत पुरवले जात अाहे.

  बाळकृष्ण जगताप, सरपंच, वरकुटे-मलवडी

  (शब्दांकन : महेश कांबळे)