माण बाजार समितीची निवडणुकीचा वाजला बिगुल ; ७ ऑगस्टला मतदान तर ८ ऑगस्टला निकाल

६ जुलै रोजी निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ६ जुलै सकाळी अकरापासून १२ जुलै रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येतील. १३ जुलै रोजी सकाळी ११ पासून अर्जांची छाननी करण्यात येईल. त्यानंतर वैध अर्जांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. १४ जुलै सकाळी ११ वाजल्यापासून पासून २८ जुलै दुपारी ३ पर्यंत अर्ज मागे घेता येतील.

  दहिवडी : बहुचर्चित माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. ७ ऑगस्टला मतदान तर ८ ऑगस्टला निकाल आहे. २०६५ बाजार समितीचे मतदार असून ते १८ संचालक निवडून देणार आहेत.बाजार समितीच्या अनुषंगाने बैठकांना सुरुवात झाली असताना एक निवडणूक कार्यक्रम समाज माध्यमातून पसरविण्यात आला होता. मात्र तो अधिकृत नव्हता. तारखेत एक दिवसाचा बदल करुन अधिकृतरित्या कार्यक्रम जाहीर करण्यात आला.

  असा आहे निवडणूक कार्यक्रम
  ६ जुलै रोजी निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ६ जुलै सकाळी अकरापासून १२ जुलै रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येतील. १३ जुलै रोजी सकाळी ११ पासून अर्जांची छाननी करण्यात येईल. त्यानंतर वैध अर्जांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. १४ जुलै सकाळी ११ वाजल्यापासून पासून २८ जुलै दुपारी ३ पर्यंत अर्ज मागे घेता येतील. २९ जुलै सकाळी ११ वाजता उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करुन चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. आवश्यक असल्यास ७ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत मतदान घेण्यात येईल. मतदानाचे ठिकाण नंतर जाहीर करण्यात येणार आहे. ८ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजलेपासून मतमोजणीस सुरुवात होणार आहे. मतमोजणीचे ठिकाण नंतर जाहीर करण्यात येणार आहे.

  -माण कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये २०६५ मतदार ठरवणार १८ संचालक

  -सोसायटी मतदार संघातून ११ संचालक निवडून द्यावयाचे आहेत. त्यासाठी ८९५ मतदार आहेत.

  -सात खुल्या प्रवर्गातील आहेत. दोन जागा महिलांसाठी, इतर मागास प्रवर्गसाठी एक तर विमुक्त जाती व भटक्या जमाती साठी एक जागा आहे.

  -ग्रामपंचायत मतदार संघातून ४ संचालक निवडून द्यावयाचे असून त्यासाठी ८३५ मतदार आहेत.

  -एक हमाल तोलाई मतदार संघातून एक संचालक निवडून द्यावयाचा असून त्यासाठी फक्त एकच मतदार असल्याने ही निवडणुक रद्द होण्याची शक्यता आहे.

  -व्यापारी व आडते मतदार संघातून २ संचालक निवडून द्यावयाचे आहेत. त्यासाठी ३३४ मतदार आहेत. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.