खासदारकीच्या विश्वासाला पात्र ठरणार : निंबाळकर

    फलटण : फलटण तालुक्यातील जनतेने प्रचंड प्रेम केले आहे. त्या ऋणातून मुक्त होता येणार नाही. परंतु या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार असून, आपण टाकलेल्या खासदारकीच्या विश्वासाला पात्र ठरणार असल्याचे उद्गार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी काढले

    विविध विकासकामांचा प्रारंभ

    फलटण तालुक्‍यातील नांदल, फरांदवाडी, सांगवी याठिकाणी विविध विकास कामांचा प्रारंभ खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, निवृत्त सनदी अधिकारी विश्‍वासराव भोसले, भाजप फलटण तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, फलटण नगरपरिषदेचे गटनेते अशोकराव जाधव, भाजप फलटण शहराध्यक्ष अमोल सस्ते, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर, नगरसेवक सचिन अहिवळे उद्योजक हनुमंतराव मोहिते, पंचायत समिती सदस्या लता कोळेकर, पै. बाळासाहेब काशीद, युवा मोर्चाचे अध्यक्ष नानासाहेब इवरे, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव पोकळे,अमित रणवरे आदी
    उपस्थित होते.

    खासदार झाल्यानंतर विविध कामे मंजूर

    खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, फलटण तालुक्यामध्ये खासदार झाल्यानंतर विविध कामे मंजूर करून घेतली. त्यामध्ये नीरा देवघर, फलटण पुणे रेल्वेचा, नाईकबोमवाडी एमआयडीसी, सीतामा्ड घाटाचा प्रश्न, धर्मपुरी ते लोणंद पर्यंतच्या कामासाठी लागणारा निधी, शेतकऱ्यांसाठी ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत, त्यांना निधी, फलटण आदर्की रस्ता मंजूरी, फलटण ते शिंगणापूर व्हाया शेनवडी मार्ग असेल अशा अनेक कामांसाठी राज्य शासनाकडून व केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध केला आहे. जनसुविधा, नागरी सुविधा, खासदार फंड, व्यायाम शाळा अंगणवाड्या व इतर सगळ्या गोष्टींसाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. तालुक्‍याचा गेली वीस पंचवीस वर्षे थांबलेला विकास; सुरू करण्याची जबाबदारी मी घेतली आहे. तालुक्‍यातले अनेक उर्वरित प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.