महाबळेश्वरवाडी बनविले पाणीदार : सरपंच अंकुश गाढवे

  म्हसवड : माण तालुक्यातील दक्षिण दिशेतील शेवटचे गाव तर सातारा व सांगली जिल्ह्याच्या सिमेवरील गाव म्हणुन महाबळेश्वरवाडीला ओळखले जाते. कायम असणारे पाण्याचे दुर्भिक्ष टाळण्यासाठी विशेेष प्रयत्न केले. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून गाव नुसते पाणीदार नव्हे तर आदर्शवद बनविले, असे महाबळेश्वरवाडीचे सरपंच अंकुश गाढवे यांनी सांगितले.
  काेट्यवधीची कामे लावली मार्गी
  अापल्या सरपंच पदाच्या कारकिर्दीत कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तगावातील अंतर्गत रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण केले. गाढवे वस्ती ते काळचौंडी रस्त्यालगतच्या ओढ्यावरील रस्त्याचे मुरमीकरण करुन रस्ता वाहतुकीस योग्य केला. गाढवेवस्ती ते शेरीचे शेत या दरम्यानच्या रस्त्याचे मुरमीकरण केले. गावातील वगरे वस्ती शाळा व महाबळेश्वरवाडी शाळा डिजीटल बनवल्या आहेत. मागासवर्गीय वस्तीमध्ये गटार बांधकाम करुन गावात सांडपाण्याची व्यवस्था केली. गावातील कोठावळेवस्ती, जगतापवस्ती, काटकरवस्ती, विठोबा मंदिर व स्मशानभुमी येथे हायमँक्स बसवून गावातील अंधार दूर केला. गावातील जेष्ठ नागरीकांना बसण्यासाठी बाकडे बसवण्यात आले आहेत, असे सरंपच गाढवे यांनी सांगितले.

  जनजागृतीतून राेखला कोरोनाचा शिरकाव

  गावाला पाणीपुरवठा  करणाऱ्या विहिरीचे नुतनीकरण करुन गावात पाण्याची सोय करण्यात यश मिळवले आहे. वेताळबा देवाचा कट्टा उभारुन नागरिकांची मागणी पुर्ण केली तर गाढवेवस्ती येथील धुळोबा मंदिर येथे सभामंडप उभारला आहे.  गाव पाणीदार बनवण्यासाठी उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावचे पोलिस पाटील, ग्रामसेवक, नागरिक अंगणवाडी सेविका, मदतनिस व महिलावर्गाला सोबत घेवऊन  एक दिलाने काम केले. त्यामुळे संपूर्ण गाव पाणीदार तर झालेच, या शिवाय एकजुटीचा नवा आदर्श निर्माण झाला. गत वर्षापासुन सुरु असलेल्या कोरोनाचा गावात शिरकाव होऊ नये, यासाठी गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जनजागृती केली. गावात सॅनिटायझरची फवारणी करुन गाव निर्जंतुकीकरण केले.  गावातील शाळांमध्ये विगीकरणाचे कक्ष उभारुन कोरोनाचा शिरकाव रोखला, असे सरपंच गाढवे यांनी सांगितले.

  पाच हजार लिटरची पाण्याची टाकी उभारली

  आगामी काळात महाबळेश्वरवाडी ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर ५ हजार लिटरची पाण्याची टाकी उभारली जाणार असून त्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. तर गावातील गाढवेवस्तीसाठी स्वतंत्र स्मशानभूमी उभारली जाणार आहे. गाढवेवस्ती ते काळचौंडी या रस्त्यावर साकवपुल उभारला जाणार आहे. डासळीच्या ओढ्यावर, कोठावळे मळ्यातील ओढ्यावर साकव पुल उभारला जाणार आहे.  सन २०१९ मध्ये गावात दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊन गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली त्यावेळी गावचा प्रथम नागरिक म्हणून गावासाठी स्वखर्चातून पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरु केला. शेवटच्या टप्प्यात पैसे कमी पडल्यावर गावातील महिलांनी सोने गहाण ठेऊन गावासाठी पैसा उभारला. तर कोविडच्या पहिल्या टप्प्यात गावातील गरजूंना एक महिन्याचे रेशन स्वखर्चाने पुरविले आहे. दुसऱ्या टप्प्यात वरकुटे-मलवडी येथे संकल्प कोविड सेंटरला २५ हजार रुपयांची अर्थिक मदत केली, असे सरपंच गाढवे यांनी सांगितले.

  साडे तीन वर्षापूर्वी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत थेट सरपंच होण्याचा पहिला बहुमान मला िमळाला. जनतेने आपल्यावर दाखिवलेला िवश्वास सार्थ ठरवून जास्तीत जास्त िवकासकामे करण्यात येतील. राजकारण बाजूला ठेऊन सर्वाच्या सहकार्याने गावचा िवकास साधण्यात येईल.

  – अंकुश गाढवे, सरपंच, महाबळेश्वरवाडी

  (शब्दांकन : महेश कांबळे, म्हसवड)