एनकूळ : नुतन सरपंच महादेव खाडे, उपसरपंच प्रमिला खरमाटे यांचा सत्कार करताना राजेंद्र खाडे ,प्रा.सदाशिव खाडे, अंकुश खरमाटे आदी.
एनकूळ : नुतन सरपंच महादेव खाडे, उपसरपंच प्रमिला खरमाटे यांचा सत्कार करताना राजेंद्र खाडे ,प्रा.सदाशिव खाडे, अंकुश खरमाटे आदी.

ग्रामपंचायत पदाधिकारी निवडीसाठी अध्यासी अधिकारी यांनी बोलवलेल्या सभेत सरपंच पदासाठी महादेव खाडे व अजितकुमार खरमाटे यांनी अर्ज दाखल केले तर उपसरपंच पदासाठी केवळ प्रमिला खरमाटे यांचाच अर्ज दाखल झाला. सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत खाडे यांना सहा मते मिळाली. तर विरोधी उमेदवार खरमाटे यांना तीन मतावर समाधान मानावे लागले. निवडीकामी किरण खाडे, महादेव जगताप, आशाताई खाडे, रोहिणी खाडे तसेच उपसरपंच सौ. खरमाटे यांनी खाडे यांना सहकार्य केले

    कातरखटाव : एनकुळ (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सेवानिवृत्त तलाठी महादेव सोपान खाडे यांची बहुमताने तर उपसरपंचपदी प्रमिला मल्हारी खरमाटे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीमुळे लोकनेते गोपीनाथ मुंढे पॅनेलच्या माध्यमातून परिवर्तन घडविले आहे.

    नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्हा बँकेचे संचालक प्रा.अर्जुनराव खाडे यांच्या नेतृतवाखालील सत्ताधारी भैरवनाथ पॅनल विरोधात पिंपरी चिंचवड प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाभाऊ खाडे, रा.स.प.चे तालुकाध्यक्ष प्राचार्य दिलीपराव डोईफोडे,व प्रा.सदाशिव खाडे यांच्या नेतृत्वाखालील लोकनेते गोपीनाथराव मुंढे परिवर्तन पॅनल यांच्यात लढत झाली.यात लोकनेते गोपीनाथ मुंढे पॅनल ने सहा जागा जिंकत परिवर्तन केले तर सत्ताधारी गटाला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले.

    ग्रामपंचायत पदाधिकारी निवडीसाठी अध्यासी अधिकारी यांनी बोलवलेल्या सभेत सरपंच पदासाठी महादेव खाडे व अजितकुमार खरमाटे यांनी अर्ज दाखल केले तर उपसरपंच पदासाठी केवळ प्रमिला खरमाटे यांचाच अर्ज दाखल झाला. सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत खाडे यांना सहा मते मिळाली. तर विरोधी उमेदवार खरमाटे यांना तीन मतावर समाधान मानावे लागले. निवडीकामी किरण खाडे, महादेव जगताप, आशाताई खाडे, रोहिणी खाडे तसेच उपसरपंच सौ. खरमाटे यांनी खाडे यांना सहकार्य केले

    पिंपरी चिंचवड प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाभाऊ खाडे रा.स.प.चे तालुकाध्यक्ष प्राचार्य दिलीपराव डोईफोडे, प्रा. सदाशिव खाडे, माजी सरपंच अंकुशराव खरमाटे, अर्जुनशेठ खाडे, युवा नेते तथा वंजारी सेवा संघाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र खाडे आदिंसह मान्यवर ग्रामस्थ, व भैरवनाथ संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी अभिनंदन केले.

    नुतन सरपंच, उपसरपंचांचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. जयकुमार गोरे, तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण आदिंसह पिंपरी चिंचवड प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाभाऊ खाडे रा.स.प.चे तालुकाध्यक्ष प्राचार्य दिलीपराव डोईफोडे, प्रा. सदाशिव खाडे, माजी सरपंच अंकुशराव खरमाटे, अर्जुनशेठ खाडे, युवा नेते तथा वंजारी सेवा संघाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र खाडे आदि मान्यवरासह खटाव-माण तालुक्यातील मान्यवरांनी अभिनंदन केले.