साताऱ्यात झेंडू शंभर रूपये किलो ; शाही सीमोल्लंघनासाठी शाहूनगरी सज्ज

यंदा अतिवृष्टीमुळे गेंदे दार झेंडू अभावानेच पहायला मिळाला . बारामती पुरंधर तसेच लोणंद निरा व खंडाळा येथून आलेल्या झेंडूचा भाव सायंकाळी उशिरापर्यंत 110 रूपये किलोवर पोहचला होता .नागरिकांनी गोलबाग व राजवाडा परिसरात खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती .

    सातारा  : अशुभांवर मात करणाऱ्या शाही दसऱ्याच्या सीमोलंघनासाठी सातारा नगरी सज्ज झाली आहे . सातारा शहरात झेंडू आणि आपट्याच्या पाने खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती . साताऱ्यात शंभर रूपये किलोने झेंडूच्या फुलांची विक्री झाली .

    साताऱ्यात यंदा आदिशक्तीच्या जागराचा उत्सवं नऊच दिवस चालला . सुवासिनिंनी गुरुवारीच दशमीच्या धपाट्यांचा आणि विविध भाज्यांचा नैवैद्य दाखवून उपवासाची सांगता केली . खंडेनवमीला शस्त्र पूजनाचे महत्व असल्याने साताऱ्यात विजयाद्शमीच्या पूर्वसंध्येला व्यापारी व नागरिकांनी आपल्या वाहनांची व यत्रांची स्वच्छता करून त्याची मनोभावे पूजा केली. विजयादशमीसाठी झेंडूच्या माळांचे तोरण घरोघरी दारावर लावले जाते . यंदा अतिवृष्टीमुळे गेंदे दार झेंडू अभावानेच पहायला मिळाला . बारामती पुरंधर तसेच लोणंद निरा व खंडाळा येथून आलेल्या झेंडूचा भाव सायंकाळी उशिरापर्यंत 110 रूपये किलोवर पोहचला होता .नागरिकांनी गोलबाग व राजवाडा परिसरात खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती . साताऱ्याचा शाही दसरा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द आहे . पोवई नाक्यावर पारंपारिक पध्दतीने खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते शस्त्र पूजनं करण्यात येणार आहे . मात्र करोना संक्रमणाच्या कारणामुळे यंदाचे सीमोल्लंघन अत्यंत साधेपणाने करण्यात येणार असल्याचे जलमंदिर वरून प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे .