बेकायदेशीर प्रवासी वाहतुक करणार्या ट्रव्हल्स वर कारवाई करताना म्हसवड पोलिस
बेकायदेशीर प्रवासी वाहतुक करणार्या ट्रव्हल्स वर कारवाई करताना म्हसवड पोलिस

बस ही माने ट्रव्हल्सची असल्याची माहिती पोलीसांनी दिली असुन अन्य एका खाजगी ट्रव्हल्स वरही अशाच प्रकारची दंडात्मक कारवाई पोलीसांनी केली असुन ती खाजगी बस ही माणदेशी ट्रव्हल्स असल्याचे पोलीसांकडुन सांगण्यात आले, त्याचा गाडी क्र.MH   01 CV 9911 आहे. दोन्ही खाजगी बसला प्रत्येकी १० हजार रुपये दंड आकारण्यात येवुन बस सोडण्यात आल्या असल्या तरी एका बस वर कलम भा.द.वि.१८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

    म्हसवड : कोरोना साथीमुळे सातारा जिल्ह्यात  कन्टेनमेंट झोन असताना बेकायदेशीरपणे मुंबईकडे  प्रवाशी वाहतूक करीत असलेल्या खाजगी ट्रॅव्हल्स बस वर म्हसवड पोलिसांनी कारवाई केली.
    याबाबत म्हसवड पोलीसांकडुन समजलेली अधिक माहिती पुढील प्रमाणे दि.३० मे च्या रात्री साडे सातच्या सुमारास सातारा-पंढरपुर रस्त्यावर म्हसवड येथील माण नदीच्या पुलावरुन मुंबईकडे निघालेली खाजगी माने ट्रॅव्हल्स गाडी नंबर MN-08T-0142 ही  उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी, सहाय्यक पोलिस निरीक्षक बाजीराव ढेकळे , सिईओ डाँ.सचिन माने,पो कॉ निलेश कूदळे, प्रदीप जाधव, अनिल वाघमोडे यांनी सदर ची खाजगी बस ही म्हसवड येथे आडवुन त्याची तपासणी केली असता सदर बस मध्ये काही प्रवासी असल्याचे आढळुन आल्यावर त्यांनी या प्रवाशांकडे चौकशी केली असता ते सर्वजण मुंबईला निघाले असल्याचे समजल्यावर संबधितांनी ट्रव्हल्स चालकाकडे चौकशी केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिल्यावर पोलिसांनी सदर बस ताब्यात घेत त्यावर दंडात्मक कारवाई केली. सदर बस ही माने ट्रव्हल्सची असल्याची माहिती पोलीसांनी दिली असुन अन्य एका खाजगी ट्रव्हल्स वरही अशाच प्रकारची दंडात्मक कारवाई पोलीसांनी केली असुन ती खाजगी बस ही माणदेशी ट्रव्हल्स असल्याचे पोलीसांकडुन सांगण्यात आले, त्याचा गाडी क्र.MH   01 CV 9911 आहे. दोन्ही खाजगी बसला प्रत्येकी १० हजार रुपये दंड आकारण्यात येवुन बस सोडण्यात आल्या असल्या तरी एका बस वर कलम भा.द.वि.१८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.