सिन्हा दांपत्याचे काम डोंगराएवढे : महादेव जानकर

  म्हसवड : ना कोणा नेत्याला, ना कोणा उद्योदपतीला, ना कोणा मंत्र्याला जे जमणार नाही असे डोंगराएवढे सामाजिक व विकासकाम माण तालुक्यातील विजय सिन्हा व चेतना सिन्हा हे दांपत्य करीत असुन त्यांच्या सामाजिक व विकीसकामामुळे माण तालुक्याला नवी दिशा तर महिलांना नवी ओळख मिळाली असल्याचे मत माजी मंत्री आ. महादेव जानकर यांना व्यक्त केले.

  म्हसवड येथे माणदेशी फौंडेशनने आयोजित केलेल्या महिला लसीकरणाच्या कार्यक्रमास आ. जानकर यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी ते बोलते होते. यावेळी माणदेशी फौंडेशनच्या प्रमुख चेतना सिन्हा, माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा, माणदेशी महिला बँकेच्या सिईओ रेखा कुलकर्णी, बाळासाहेब डोंगरे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना आ. जनाकर म्हणाले की, माण तालुक्यात दुष्काळा व्यतीरीक्त काहीही नव्हते. मात्र या दुष्काळाच्या वादळात सामाजिक कार्यातुन विकासाचा दिवा लावण्याचे मोठे काम चेतना सिन्हा व विजय सिन्हा यांनी केले आहे. चेतना सिन्हा यांच्यामुळे म्हसवडसारख्या ग्रामीण भागात आंतरराष्ट्रीय दर्जाची महिला बँक उभी राहिली आहे या बँकेमुळे ग्रामीण महिलांचे आर्थिक सबलीकरण होत आहे, तर माणदेशी फौंडेशन च्या माध्यमातुन ग्रामीण महिलाना अनेक छोटे – छोटे लघु उद्योग सुरु करता आले आहेत. त्यामुळे अनेक महिला ह्या आता कुटुंब प्रमुख बनल्या आहेत. ग्रामीण भागात आंतरराष्ट्रीय एनजीओ फक्त चेतना सिन्हा यांच्या प्रयत्नामुळे येवु लागल्या आहेत त्यामुळे ग्रामीण भागात अनेक बंधारे उभारले गेले आहेत त्या बंधार्यांमुळे अनेक गावातील पाणी टंचाई दुर झाली आहे तर हजारो महिलांच्या डोक्यावरील हंडे उतरले आहेत.

  सामाजिक कामाचा वसा घेतलेल्या चेतनाभाभींनी महिलांसाठी विविध योजना राबवल्या आहेत त्यांच्या सामाजिक कामातुन अनेक ठिकाणी डोंगराएवढी मोठी विकासकामे झाली असुन ही विकासकामे कोणा नेत्याला वा मंत्र्यालाही करता येणे शक्य नाही.
  कोरोना काळात ही माणदेशी ने सामाजिक बांधिलकी म्हणुन गत वर्षापासुन मोफत ऑक्सीजन बेड, ऑक्सीजन मशीन, मास्क सेनटायझर, मोफत जेवन उपलब्ध करुन देत आहे तर आता कुटुंबाची खरी गरज ओळखुन माणदेशी फौंडेशन ने महिलांना कोरोना प्रतिबंधित लस देत आहे त्याचा हजारो महिलांना लाभ होणार आहे, शासनाला जे शक्य नाही ते माणदेशी ने करुन दाखवले आहे याचा आपणाला सार्थ अभिमान वाटत असल्याचे शेवटी जानकर यांनी सांगितले.

  माणदेशी फौंडेशनने जनावरांची चारा छावणी केली सुरु

  सन २०१८ साली माण तालुक्यात भयानक असा दुष्काळ पडलेला असताना शेतकर्यांचे लाखमोलाचे पशुधन वाचवण्यासाठी राज्यात सर्वप्रथम माणदेशी फौंडेशन ने जनावरांची चारा छावणी सुरु करुन जवळपास १२ हजार जनावरांचे प्राण वाचवण्याचे काम केले होते, माणदेशीच्या या चारा छावणीमुळेच तत्कालीन राज्यसरकारला राज्यात ठिकठिकाणी चारा छावण्या सुरु करण्याचा निर्णय घ्यावा लागला होता.

  विजय सिन्हा हे आपले सामाजिक व राजकिय गुरु

  मी लहान होतो तेव्हापासुन विजय सिन्हा यांचे सामाजिक कार्य मी पहात आलो आहे संघर्ष युवा वाहिनीद्वारे त्यांनी मजुर वर्गासाठी उभारलेली चळवळ मी जवळुन पाहिली आहे त्यांच्याच प्रेरणेमुळे मी राजकारणात सक्रीय झालो असुन आज मी या उंचीवर पोहचलो ते केवळ विजय सिन्हा यांच्याच प्रेरणेमुळे त्यामुळे ते मला गुरुस्थानी आहेत असे ही आ. जानकर यांनी सांगितले.

  मेगासिटी ते झगडे वस्ती रस्त्यासाठी निधी देणार

  म्हसवड पालिका हद्दीतील झगडे वस्ती ते मेगासिटी हा रस्ता पुर्णपणे खराब झाला आहे या रस्त्यासाठी मी लागेल तेव्हा निधी उपलब्ध करुन देईन कमी पडल्यास नियोजन मधुन निधी आणुन देईन पण ह्या रस्त्याचे डांबरीकरण पुर्ण होईल असे आश्वासन ही आ. जानकर यांनी यावेळी दिले.