मराठा आरक्षणाचे कोण राजकारण करतंय का, याचा शोध पोलिसांनी करावा ;  राष्ट्रवादीच्या कार्यालयावरील हल्ल्याने आमदार शशीकांत शिंदे संतप्त

भाजपमधील मराठा नेत्यांना तुम्ही काय आवाहन कराल, यावर आमदार शिंदे म्हणाले, सगळ्यांनी मिळून या प्रश्नावर तातडीने निर्णय घ्यावा. मराठा समाजाची पोटतिडीक असेल तर भाजपने पुढाकार घ्यावा. आमची तयारी आहे. पण ज्यावेळी मराठा समाज आंदोलनात उतरेल, त्यावेळी आमच्यासारखे कार्यकर्ता या समाज बांधवांसमवेत खांद्याला खांदा लावून लढाईत उतरेल, असा विश्वास त्यांनी दिला.

    सातारा : ‘राष्ट्रवादी’च्या कार्यालयावरील हल्ल्याने आमदार शशीकांत शिंदे गुरुवारी कमालीचे संतप्त झाले . या प्रकरणाचा तातडीने पोलिसांनी तपास करून संबंधितांचा शोध घ्यावा अशी त्यांनी मागणी केली .

    शिंदे पुढे म्हणाले ,महाराष्ट्रात मराठा आरक्षणाबाबत राष्ट्रवादीची भूमिका या समाजाच्या कायम पाठीशी राहणारीच आहे. मराठा आरक्षणाचे कोण राजकारण करतंय का, याचा शोध पोलिसांनी करावा. राजकारण करून महाराष्ट्रातील वातावरण दुषित करण्याचे व महाराष्ट्राची शांतता भंग करण्याचे काम कोणी करत असेल तर राज्य सरकारने याची गांभीर्याने दखल घ्यावी .मराठा समाजाची पोटतिडीक असेल तर आरक्षणासाठी भाजपने पुढाकार घ्यावा. आमची तयारी आहे. पण ज्यावेळी मराठा समाज आंदोलनासाठी रस्त्यावर उतरेल. त्यावेळी आमच्यासारखे कार्यकर्ते या समाज बांधवांसमवेत खांद्याला खांदा लावून लढाईत उतरेल, असा इशाराही त्यांनी दिला

    राष्ट्रवादी भवनात पत्रकारांशी बोलताना आमदार शिंदे म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काहीही संबंध नाही. याचिकाकर्ते सदावर्ते त्यांनी सातत्याने शरद पवार, सुप्रिया सुळे व अजित पवार यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली आहे. जर याचिकाकर्ते आमचे असते तर त्यांनी अशी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली नसती.

    महाराष्ट्रात मराठा आरक्षणाबाबत राष्ट्रवादीची भूमिका या समाजाच्या कायम पाठीशी राहणारीच आहे. मराठा आरक्षणाचे कोण राजकारण करतंय का, याचा शोध पोलिसांनी करावा. राजकारण करून महाराष्ट्रातील वातावरण दुषित करण्याचे व महाराष्ट्राची शांतता भंग करण्याचे काम कोणी करत असेल तर राज्य सरकारने याची गांभीर्याने दखल घ्यावी.

    मराठा आरक्षण लढाईत आम्ही प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभागी होतो. पण जाणीवपूर्वक एका पक्षाला टर्गेट करण्याचे काम कोणी करत असेल तर त्याला त्याच पध्दतीने उत्तर देण्याची ताकद आमची आहे. मला वाटत नाही, मराठे असे काही करणार नाहीत. मराठे पाठीमागून वार करत नाहीत मराठे समोरून वार करतात. या सर्व घटनांमागचा सुत्रधार कोण आहे, याचा पोलिसांनी शोध घ्यावा, अशी अपेक्षा आमदार शिंदे यांनी व्यक्त केली.

    राज्यात अस्थितरता होऊ नये, मराठा बांधवांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि भविष्यातही राहणार आहे. काही तासापासून याबाबत राजकारण करण्याचा प्रकार सुरू झालेला आहे. याची शंका काल व्यक्त केली होती. भाजप ज्या पध्दतीने सांगतंय १०५ च्या घटनादुरूस्तीचा अधिकार नसताना तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पण अशा प्रकारचा ठराव केलेला असेल तर तो आमच्या डोळ्यात धुळफेक करणार होता का?.

    आमदार शिंदे म्हणाले, तो टिकला नाही. वकिल तेच सगळे तेच बाजू भक्कमपणे मांडली नाही, म्हणून काही प्रत्येक गोष्टीत काही नेते राजकारण करतात, हे दुर्दैव आहे. याचा मी निषेध करतो. आम्ही उद्याचा लढ्यात सहभागी असू पण, एका पक्षाला टार्गेट करण्याच्या प्रयत्नाचाही आम्ही निषेध करतो. आरक्षणप्रश्नी भाजप राजकारण करतंय का, या प्रश्नावर आमदार शिंदे म्हणाले, शंभर टक्के भाजप राजकारण करत आहे.

    हे आरक्षण होऊ नये किंवा यामध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न करणे एवढेच काम त्यांच्याकडून होत आहे. त्याला भाजपच जबाबदार आहे. मराठा आरक्षणाबाबत देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांना वाटत असेल सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे केंद्र सरकारने व राष्ट्रपतींने निर्णय करावा, आम्ही त्यांच्या सोबत आहे. त्यांनी उद्याच्या उद्या जशी ३७० ची घटना बदलण्याचा निर्णय घेतला. त्यापध्दतीने मराठा आरक्षणाबाबत केंद्राने पुढाकार घ्यावा.

    अख्खा महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा राहिल. याबाबत खुद्द मुख्यमंत्र्यांनी तर हात जोडून विनंती केलेली आहे. नाही झाले तर धनगर आरक्षणात ज्या पध्दतीने वेळकाढूपणा करत राजकारण केले. त्यापध्दतीने मराठा आरक्षणाचे राजकारण करू नये. हा समाज आणि मराठा पुरोगामी विचाराचा आहे. अशा पध्दतीने ज्या ज्या वेळी गोष्टी घटतील, त्या त्या वेळी समाज आणि माझा मराठा समाज आणि तरूण सुशिक्षित आणि सोशित आहे. त्याचा वापर होऊ देणार नाही, याची मला खात्री आहे.

    भाजपमधील मराठा नेत्यांना तुम्ही काय आवाहन कराल, यावर आमदार शिंदे म्हणाले, सगळ्यांनी मिळून या प्रश्नावर तातडीने निर्णय घ्यावा. मराठा समाजाची पोटतिडीक असेल तर भाजपने पुढाकार घ्यावा. आमची तयारी आहे. पण ज्यावेळी मराठा समाज आंदोलनात उतरेल, त्यावेळी आमच्यासारखे कार्यकर्ता या समाज बांधवांसमवेत खांद्याला खांदा लावून लढाईत उतरेल, असा विश्वास त्यांनी दिला.