सातारा शहरात वसतिगृह उभारण्यासाठी आमदार शशिकांत शिंदे यांचा पाठपुरावा

    सातारा : सातारा शहरामध्ये इंजिनिअरिंग, फार्मसी, आयटीआय इत्यादींसारखी विविध महाविद्यालये असून, लवकरच वैद्यकीय महाविद्यालयही सुरू होणार आहे. या महाविद्यालयांत शिकण्यासाठी सातारा व इतर जिल्ह्यातून दरवर्षी हजारो विद्यार्थी शहरात येत असतात. मात्र, येथे विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृहाची सोय उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय निर्माण होत आहे.

    मंत्री नवाब मलिक यांच्या दालनामध्ये त्यांची भेट घेऊन सातारा शहरात विद्यार्थ्यांसाठी लवकरात लवकर वसतिगृह मंजूर करावे, अशी शिफारस तसेच आग्रही मागणी करण्यात आली. याबाबत सकारात्मक निर्णय घेत शाहूपुरी आयटीआय कॉलेज सातारा येथे जागेची पाहणी करून वसतिगृहाचा प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना अधिकरी वर्गास देण्यात आल्या. माझ्या मागणीनुसार सातारा येथे शासकीय वसतिगृह बांधण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मंत्री मलिक यांचे आभार मानले.