मनसेचे जिल्हाध्यक्ष बनले अपघातग्रस्ताचा आधार

खटाव तालुक्यातील खातगुण गावात राहणारा विक्रम लावंड हा गरीब कुटुंबातील मुलगा आहे. घरची परिस्थिति हालाखीची असल्यामुळे तो मोलमजूरी करुन घर चालवत होता. परंतु एसटी बसच्या अपघातात त्याला एक पाय गमवावा लागला. त्याच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला होता. ही गोष्ट मनसेचे सातारा जिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटील यांना समजताच पाटील यांनी त्याला कृत्रिम पाय बसवण्यासाठी आर्थिक मदत केली.

    वडूज : सद्य परिस्थितीत गरिबांना संकटकाळी आधार देणारे बोटांवर मोजण्यासारखेच आहेत. पण सतत काही ना काही उपक्रमात सक्रिय असणारे मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील मात्र नेहमीच चर्चेत असतात. मग कोरोना पार्श्वभूमीवर गरीब कुटुंबातील लोकांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप असो, वा अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या व्यक्तीना आर्थिक मदत असो. असंच अजून एक सामाजिक कार्य पाटील यांनी केलं आहे.

    खटाव तालुक्यातील खातगुण गावात राहणारा विक्रम लावंड हा गरीब कुटुंबातील मुलगा आहे. घरची परिस्थिति हालाखीची असल्यामुळे तो मोलमजूरी करुन घर चालवत होता. परंतु एसटी बसच्या अपघातात त्याला एक पाय गमवावा लागला. त्याच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला होता. ही गोष्ट मनसेचे सातारा जिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटील यांना समजताच पाटील यांनी त्याला कृत्रिम पाय बसवण्यासाठी आर्थिक मदत केली. या मदतीमुळे विक्रम अगदी भारावून गेला. धैर्यशिल पाटील यांनी इतर सामाजिक संस्था व सामाजिक कार्यकर्ते यांना विक्रमला मदत करण्याचे आवाहन केले. यावेळी सागर कट्टे, नानासो कट्टे, प्रथमेश नवले, कुलदीप माने, बालाजी माने, युवराज पाटील, चंद्रकांत सावंत, राहुल भोसले व मनसैनिक उपस्थित होते.