शिवेंद्रसिंहराजेंनी सूचित केल्याप्रमाणे कुसुंबी जिल्हा परिषद गटात ८० लाखांपेक्षा जास्त विकासकामे : अर्चना रांजणे

  केळघर/नारायण जाधव : कुसुंबी जिल्हा परिषद गटात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सूचित केलेली व जिल्हा परिषदेच्या सदस्या अर्चना रांजणे यांच्या पाठपुराव्यामुळे ८० लाखांहून अधिक विकासकामांना मंजूरी मिळाली. अर्चना रांजणे यांच्या शिफारशीनुसार जिल्हा वार्षिक योजना विशेष दुरुस्ती योजनेतून अनेक कामे मंजूर झाली आहेत.

  त्यामध्ये मोळेश्वर शाळा दुरुस्ती (दीड लाख), मांटी ढेबेवस्ती शाळा दुरुस्ती (३ लाख), वेळे ढेण शाळा दुरुस्ती (दीड लाख), बालदार वाडी शाळा दुरुस्ती (दीड लाख), जांभुळवाडी शाळा दुरुस्ती (दीड लाख), बामणोली कसबे शाळा दुरुस्ती (दीड लाख), तेटली अंगणवाडी इमारत दुरुस्ती (एक लाख), तेटली मुरा अंगणवाडी इमारत दुरुस्ती (एक लाख), म्हाते मुरा अंगणवाडी इमारत दुरुस्ती (५०हजार), अशी कामे मंजूर झाली आहेत. जनसुविधा योजनेअंतर्गत पुढील कामांना मंजुरी मिळाली आहे. नांदगणे येथे स्मशानभूमी रस्ता सुधारणा (३ लाख),कोळघर स्मशानभूमी सुधारणा (३ लाख),बाहुळे-पुनवडी-भामघर येथे स्मशानभूमी सुधारण्यासाठी प्रत्येकी ३ लाख रुपये.

  जिल्हा परिषदेच्या १५ व्या वित्त आयोगातून मंजूर कामे पुढीलप्रमाणे :

  • म्हाते मुरा येथे प्राथमिक शाळेला स्वछतागृह बांधणे (दीड लाख), मोहाट येथे अंतर्गत बंदिस्त गटार बांधणे (दोन लाख),आंबेघर मेढा येथे महिलांसाठी सार्वजनिक स्वछतागृह बांधणे (३लाख),आंबेघर मेढा गावठाण रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (३लाख),वरोशी येथे अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे (३लाख), घरातघर फाटा -गांजे येथे रस्ता देखभाल दुरुस्ती व संरक्षक भिंत बांधणे (२लाख),गांजे येथे सार्वजनिक पाणी पुरवठा विहिरीलगतच्या रस्ता दुरुस्ती व देखभाल तसेच संरक्षण भिंत बांधणे (१लाख ९०हजार),निधी मंजूर झाला आहे.
  • बोंडारवडी येथे नळपाणी पुरवठा योजना (एक लाख),मुकवली मुरा, म्हाते बुद्रुक ,रेंगडी ,केळघर येथे नळपाणी पुरवठा योजनेसाठी प्रत्येकी एक लाख रुपये. पुनवडी येथे नळपाणी पुरवठा योजना (२लाख),तळोशी येथे नळपाणी पुरवठा योजना (९२ हजार),घरातघर -गांजे येथे झरा बळकटीकरण साठी (एक लाख९६हजार),गांजे वाढीव नळपाणी पुरवठा योजना व शाळेस पाण्याची टाकी बांधणे २ लाख तर नवीन अंगणवाडी इमारत बांधकामासाठी खिलारमुरा येथे (८लाख५०हजार).
  • तसेच वाटंबे,सायळी ,मोळेश्वर येथे अंगणवाडी इमारत बांधकामासाठी प्रत्येकी ८ लाख ५० हजार रुपये निधी मंजूर झाला आहे. कुसुंबी गटात मोठ्या प्रमाणावर विकासकामे होत असल्याबद्दल अर्चना रांजणे यांचे अभिनंदन जनतेकडून होत असून, गटातील रखडलेली विकासकामे लवकरात लवकर पूर्ण करून शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून कुसुंबी गट जिल्ह्यात आदर्श करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही अर्चना रांजणे यांनी दिली.