यशवंतराव चव्हाणांचे शिष्य म्हणूनच खासदार पाटील यांच्याकडे पाहिलं जातं : सारंग पाटील

    केळघर : यशवंतराव चव्हाणांसारखे महान प्रतिभावंत नेते सातारा जिल्ह्याला लाभले होते. त्यांचेच शिष्य म्हणून खासदार श्रीनिवास पाटील यांच्याकडे आज पाहिले जाते. त्यांच्या आदर्श विचारांचा वारसा जपत मतदारसंघाचा कारभार पाहत असताना विकासकामात आपला परका भेदभाव त्यांनी कधीच मानला नाही. तर आजपर्यंत पवारसाहेबांचा आदेश त्यांनी कधीच डावलला नाही तर तो एक आवाहन म्हणून स्वीकारून त्यामध्ये जनतेच्या प्रेमावर यशही मिळविले आहे. पवारसाहेबांचे प्रमाणेच त्यांचे सर्वसामान्य जनतेवर निस्सीम प्रेम आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आयटी सेलचे राज्याध्यक्ष सारंगबाबा पाटील यांनी व्यक्त केले.

    मेढा ता. जावली येथील महात्मा गांधी वाचनालयाच्या स्वर्गीय विजयाताई थत्ते सभागृहात आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत सारंगबाबा पाटील बोलत होते. ते पुढे म्हणाले, शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा खासदार पाटील सक्षमपणे चालवित आहेत. विकासकामे ही होतच राहतात. पण तळागाळापर्यंत जाऊन सर्वसामान्य कार्यकत्यापर्यंत संपर्क ठेवून प्रत्येकाच्या अडीअडची सोडविण्यासाठी श्रीनिवास पाटील नेहमीच प्रयत्नशील असतात असे सुचित केले.

    यावेळी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ समितीचे सभापती अमितदादा कदम म्हणाले . कार्यकर्ता हा त्यांच्या कामामुळे ओळखला जातो. त्यांना पाठबळ देण्यासाठी त्यांच्या पाठीशी विकास कामांचा डोंगर उभा करणे गरजेचे आहे असे सुचित केले.

    नारायणराव शिंगटे, सुरेश पार्टे , शिवाजी देशमुख , प्रकाश कदम यांनी आपल्या मनोगतातून विविध विकास कामांचा उहापोह केला. बैठकिला अमित कदम, राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष व जेष्ठ नेते बबन वारागडे, नारायणराव शिंगटे , सुरेश पार्टे, शिवाजीराव देशमुख, प्रकाश कदम, राजेंद्र जाधव, हणमंत शिंगटे, अतुल भोसले,धनंजय पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

    प्रारंभी वाचनालय व मेढा धरणग्रस्त यांचे वतीने सारंग पाटील यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान खासदार श्रीनिवास पाटील यांच्या आदेशाप्रमाणे सारंग पाटील यांनी वे०णा दक्षिण विभागातील तसेच मेढा व परिसरातील गांवाना भेटी देऊन कार्यकर्ते व ग्रामस्थांशी सुसंवाद साधला.