आरोग्यिता समूहाने कृषी आरोग्य प्रबोधनाचे जबाबदारी घ्यावी : श्रीनिवास पाटील

  कराड : कोरोना महामारीच्या काळात आरोग्याचे महत्त्व संपूर्ण जगाच्या लक्षात आले आहे. हेच काम गेल्या १४ वर्षापासून आरोग्यिता समूहाकडून सुरू आहे. तशाच पद्धतीने भविष्यात शेतीच्या आरोग्याची काळजी घेण्यासह कृषि आरोग्य प्रबोधन करावे, असे आवाहन खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.

  सोहळ्यात एएस अँग्री अँड अँक्वा एलएलपीचे चेअरमन डॉ. प्रशांत झाडे, कोल्हापूर कॅन्सर सेंटर आणि रोबोसर्ज- रोबोकेर रोबोटिक सेंटरचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सुरज पवार आणि खादी व ग्रामोद्योग महाराष्ट्र शासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांना आरोग्यिता सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दरम्यान, मेडीकल साहित्य निर्मिती करणारे उद्योजक शशांक शेंडे, कोरोना काळात विशेष उल्लेखनिय कार्य करणारे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कुंभार, कोरफड प्रसारक सनस्टार कंपनीचे सीएमडी ऋषिकेश पाटील, संगम हेल्थ क्लबचे आरोग्य व आहार तज्ज्ञ मुरली वत्स यांचा आरोग्यिता गौरवचिन्ह देऊन विशेष सत करण्यात आला.

  आरोग्यिता मासिक व आरोग्यिता चारिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्यिता सन्मान पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल, आंतरराष्ट्रीय कृषितज्ञ डॉ. साईनाथ हाडोळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा उपस्थित होते.

  प्रास्ताविक शरद गाडे यांनी केले. तर आभार डॉ. सतीश शिंदे यांनी मानले. यावेळी उद्योजक सलीम मुजावर, कराड तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव अरविंद चव्हाण, उद्योजक आर.टी.स्वामी, सुशील वडतकर उपस्थित होते.

  आरोग्यिता समूहाने प्रबोधनाचा विचार जपला…

  सलग १४ वर्ष आरोग्याविषयीच्या प्रबोधनाचा विचार जपन्याचे काम सोपे नाही. आणि ते काम गाडे यांनी आरोग्यिता मासिकाच्या माधमातून केले आहे. आरोग्यिता पुरस्काराने सन्मानित करणाऱ्या आलेल्या मान्यवरांचे समाजासाठीचे योगदान मोलाचे आहे. कोरोना महामारीने आरोग्याचे महत्व स्पष्ट झाले आहे. भविष्यातही सर्वसामान्यांच्या आरोग्य जपण्याचे काम जसे डॉक्टरांना करायचे आहे. तसेच आरोग्यविषयक प्रबोधन करून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम आरोग्यिता समूह भविष्यातही करेल, अशी अपेक्षा जिल्हा पोलिस प्रमुख अजयकुमार बन्सल यांनी व्यक्त केली.