खासदार उदयनराजे भोसले न्यायालयात हजर, काय आहे प्रकरण जाणून घ्या

टोलनाका परिसरात तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे टोलनाका परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. उदयनराजे आणि इतर १५ जणांनी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भुंईज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला होता.

वाई : खासदार छत्रपती उदयनराजे भोसले (MP Udayan Raje Bhosale) यांनी वाई (Wai court) न्यायालयात हजेरी लावली होती. २०१७ मध्ये आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhosale_ आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यात झालेल्या वादाच्या सुनावणीसाठी उदयनराजे वाई न्यायालयात हजर झाले होते. आनेवाडी टोल नाका (Toll Naka) हस्तांतरण करण्याच्या कारणावरुन या दोन नेत्यांमध्ये जोरदार वाद झाला होता.

आनेवाडी टोलनाक्याचे व्यवस्थापन आपल्याकडे घेण्यासाठी शिवेंद्रराजे भोसले प्रयत्न करत होते. परंतु ह्या टोलनाक्याचे व्यवस्थापन उदयनराजे भोसले यांच्या समर्थकाकडे होते. या मुद्यावरुन शिवेंद्र राजे आणि उदयनराजे यांच्यामध्ये जोरदार वाद झाला. टोलनाक्याचा ताबा घेण्यासाठी दोन्ही राजे एकमेकांसमोर ठाकले होते. तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही मोठी धुमश्चक्री झाली होती. दरम्यान तेव्हा जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते. हा आदेश लागू असताना मोठा वाद निर्माण झाला होता.

टोलनाका परिसरात तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे टोलनाका परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. उदयनराजे आणि इतर १५ जणांनी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भुंईज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला होता. यानंतर शिवेंद्रराजे यांच्या घरासोमर झालेल्या गोळीबार आणि वादामुळे गोंधळ उडाला होता. या प्रकरणात उदयनराजे भोसलेंचे कार्यकर्त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. परंतु उदयनराजे यांना वारंवार समन्स बजावूनही हजर ते हजर झाले नव्हते.

उदयनराजे भोसलेंसह आज अन्य कार्यकर्त्यांसह न्यायालयात हजर राहिले होते. यावेळी प्रथत वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही एन गिरवलकर यांनी दोन्ही बाजूच्या युक्तिवाद एकूण घेतला. पुढील सुनावणी ७ डिसेंबरला ठेवण्यात आली आहे. उदयनराजेंच्या वतीने वकील ताहेर मणेर तर सरकारी पक्षाच्या वतीने मिलिंद पांडकर यांनी न्यायालयात काम पार पाडले. यावेळी उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी न्यायालयाच्या परिसरात तोबा गर्दी केली होती.