राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे मराठा समाजावर अन्याय, खासदार उदयनराजे भोसले यांचे टीकास्त्र

मराठा आरक्षणाचे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग केले आहे. याच पार्श्वभूमीवर खासदान उदयनराजे भोसले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मराठा समाजाच्या प्रश्नाबाबत सरकार गंभीर नव्हते. त्यामुळे आज मराठा समाजाला परिणाम भोगावा लागत आहे. सरकारने तातडीने अध्यादेश काढून मराठा आरक्षण अबाधित ठेवावे अन्यथा येणाऱ्या समस्यांना सामोरे जावे.

सातारा : मराठा आरक्षण (Maratha reservation) प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) घटनापीठाकडे वर्ग केल्यानंतर सत्ताधारी ठाकरे सरकारवर चहुबाजूंनी टीकांना सामोरे जावे लागत आहे. मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत राज्यातील सरकार कधीच गंभीर नव्हते. त्याचा मोठा परिणाम मराठा समाजाला भोगावा लागला आहे. सर्वोच्च नायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने समाजाच्या प्रगतीला खिली बसली आहे. राज्य सरकरने समाजाला विश्वासात घेऊन योग्य कार्यवाही केली असती तर मराठा आरक्षण कायम टिकवता आले असते. अशी टीका खासदार उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosale) यांनी केली आहे. तसेच ठाकरे सरकारने तातडीने अध्यादेश काढून मराठा आरक्षण अबाधित ठेवावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

मराठा आरक्षणाचे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग केले आहे. याच पार्श्वभूमीवर खासदान उदयनराजे भोसले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मराठा समाजाच्या प्रश्नाबाबत सरकार गंभीर नव्हते. त्यामुळे आज मराठा समाजाला परिणाम भोगावा लागत आहे. सरकारने तातडीने अध्यादेश काढून मराठा आरक्षण अबाधित ठेवावे अन्यथा येणाऱ्या समस्यांना सामोरे जावे. तसेच मराठा समाज एकट नसून मी त्यांच्या सोबत आहे. असे उदयानराजे म्हणाले. मराठा आरक्षण प्रकरण उच्च न्यायालयात टिकवता आले. परंतु सर्वोच्च न्यायालयाने निर्णयाने मोठा धक्का बसला आहे.

राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे मराठा समाजावर ही वेळ आली आहे. ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देण्यासाठी विशेष बाब सिद्ध करण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयात प्रकरण हाताळताना राज्य सरकारने खबरदारी घेतली नाही. सरकार कोणत्याही पक्षाचे असो. ही सर्वांची जबाबदारी आहे. आता अध्यादेश काढून मराठा आरक्षण अबाधित ठेवणे, हाच मार्ग शासनासमोर आहे, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.