साताऱ्यात खूनाची मालिका सुरूच , यवतेश्वर पॉवर हाऊसजवळ दुकान चालकाचा निर्घृण खून

सातारा : सातारा शहरालगत कास रस्त्यावरील पावर हाऊस येथे शुक्रवारी रात्री बबन गोखले (वय ४०, रा. मंगळवार पेठ) यांचा दोघांनी धारदार शस्त्राने निर्घृण खून केला. दुकानात झालेल्या वादावादीनंतर संशयितांनी हा खून केल्याचे प्राथमिक कारण समोर येत आहे.

सातारा : सातारा शहरालगत कास रस्त्यावरील पावर हाऊस येथे शुक्रवारी रात्री बबन गोखले (वय ४०, रा. मंगळवार पेठ) यांचा दोघांनी धारदार शस्त्राने निर्घृण खून केला. दुकानात झालेल्या वादावादीनंतर संशयितांनी हा खून केल्याचे प्राथमिक कारण समोर येत आहे. चार दिवसांतील हा दुसरा खून झाल्याने सातारा हादरून गेला आहे. दरम्यान, शाहूपुरी पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे.

बबन गोखले यांचे दुकान आहे. शुक्रवारी त्यांची उधारी न देण्यावरून वादावादी झाली होती. याचा राग मनात धरून संशयितांनी धारदार हत्यार आणून दुकानाजवळ हल्ला केला. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती परिसरात मिळताच तणावाचे वातावरण निर्माण झाले. शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. संशयितांची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, मंगळवारी समर्थ चौक परिसर येथे खून झाला होता. चौथ्या दिवसांतील हा दुसरा खून झाल्याने समर्थ मंदिर परिसर, मंगळवार पेठ व बोगदा परिसर पुन्हा हादरून गेला आहे.