फलटण तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेच्या अनागोंदी कारभारा विरोधात राष्ट्रीय काँग्रेसचे निवेदन

निवेदनात तात्पुरती नेमणूक करण्यात आलेल्या व्यक्ती कडून रेशन कार्ड मधील नोंदीत बदल करणे, कालावधी पुर्ण होऊन पुरवठा अधिकाऱ्यांची बदली न होणे, रेशन दुकानदारांकडून ग्राहकांना पावत्या न देणे त्यासंदर्भात तक्रारी येऊनही पुरवठा अधिकारी यांनी दखल न घेणे,रेशन वाहतुकीच्या गाड्या व त्यातील मालाची ची तपासणी न होणे,बचतगटाच्या नांवाने कार्यालयाशी संबंधित व्यक्ती ने अर्ज करणे किंवा दुकान चालवणे या सारख्या अनेक बाबी निदर्शनास आणून दिल्या आहेत.

    फलटण : फलटण तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेच्या अनागोंदी कारभारा विरोधात व अनियमितते बाबत राष्ट्रीय काँग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी सचिन भैय्या सुर्यवंशी बेडके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी बेडके व जिल्हा काँग्रेसच्या अनूसुचित जाती सेलचे उपाध्यक्ष सिद्धार्थ दैठणकर यांनी आवाज उठवत मा.प्रांत अधिकारी. शिवाजी जगताप यांना निवेदन दिले आहे.

    सदर निवेदनात तात्पुरती नेमणूक करण्यात आलेल्या व्यक्ती कडून रेशन कार्ड मधील नोंदीत बदल करणे, कालावधी पुर्ण होऊन पुरवठा अधिकाऱ्यांची बदली न होणे, रेशन दुकानदारांकडून ग्राहकांना पावत्या न देणे त्यासंदर्भात तक्रारी येऊनही पुरवठा अधिकारी यांनी दखल न घेणे,रेशन वाहतुकीच्या गाड्या व त्यातील मालाची ची तपासणी न होणे,बचतगटाच्या नांवाने कार्यालयाशी संबंधित व्यक्ती ने अर्ज करणे किंवा दुकान चालवणे या सारख्या अनेक बाबी निदर्शनास आणून दिल्या आहेत.

    याप्रसंगी फलटण तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष अमिरभाई शेख,शहराध्यक्ष पंकज पवार, जिल्हा सरचिटणीस शंकरराव लोखंडे, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र खलाटे, तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष अजिंक्य कदम,उपाध्यक्ष गंगाराम रणदिवे,उपाध्यक्ष नवनाथ लोखंडे, शहर युवक अध्यक्ष प्रितम जगदाळे, अल्पसंख्यांक सेलचे तालुका अध्यक्ष ताजूभाई बागवान,अनुसुचित जाती जमाती तालुका अध्यक्ष अभिजित जगताप तसेंच काँग्रेसच्या विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.